शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

बुलडाणाचा पोलीस शिपाई यवतमाळ पोलिसांवर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:00 IST

तीन दिवसांपूर्वी सायबर सेल आणि दामिनी पथकाने स्थानिक आठवडी बाजारातील राम शर्मा याच्या डिजिटल क्रिकेट सट्ट्यावर धाड घातली. तेथून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक करण्यात आली. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषद घेऊन या धाडीची माहिती दिली. यावेळी झालेल्या फोटो सेशनमध्ये एक अनोळखी चेहरा पोलिसांमध्ये आढळून आला. पत्रकारांनी स्थानिक पोलिसांकडे हा व्यक्ती नेमका अधिकारी कोण, याची विचारणा केली असता बुलडाण्यातील पंकजच्या एकूणच ‘कामगिरी’चे बिंग फुटले.

ठळक मुद्देधाडींसाठी देतोय ‘टीप’ : यवतमाळात मुक्काम, अनेक धाडीत सहभाग, फोटोतही झळकला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बुलडाणा जिल्हा पोलीस दलात नियंत्रण कक्षात कार्यरत पंकज नामक पोलीस शिपाई यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील तमाम डिटेक्शन ब्रँचवर भारी पडल्याचे दिसून येते. पंकजच्याच टीपवरून स्थानिक पोलीस धाडी घालत असून तो स्वत: धाडीतही सहभागी होत असल्याचे सिद्ध झाले. तीन दिवसांपूर्वी सायबर सेल आणि दामिनी पथकाने स्थानिक आठवडी बाजारातील राम शर्मा याच्या डिजिटल क्रिकेट सट्ट्यावर धाड घातली. तेथून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक करण्यात आली. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषद घेऊन या धाडीची माहिती दिली. यावेळी झालेल्या फोटो सेशनमध्ये एक अनोळखी चेहरा पोलिसांमध्ये आढळून आला. पत्रकारांनी स्थानिक पोलिसांकडे हा व्यक्ती नेमका अधिकारी कोण, याची विचारणा केली असता बुलडाण्यातील पंकजच्या एकूणच ‘कामगिरी’चे बिंग फुटले. पोलीस वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार पंकज बुलडाणा सीआरओला कार्यरत असून, आधीपासूनच साहेबांच्या गुडबूकमध्ये आहे. तो अनेकदा येथे येतो. सायबरमधील माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांना येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांची टीप देतो. त्या आधारे धाडी घालून त्या यशस्वीही केल्या जातात. यावरून एकटा पंकज येथील क्राईम ब्रँच व डिटेक्शनची जबाबदारी असलेल्या अनेक पथकांवर भारी पडल्याचेही मानले जाते. गुरुवारीही दुपारी पंकज साहेबांच्या केबिनसमोर झळकल्याने त्या धाडीपासून त्याचा मुक्काम येथेच असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळातील कामगिरीसाठी पंकज अधिकृतरित्या बुलडाणा येथे सुट्या टाकून येतो की ‘गुडफेथ’मध्ये रवानगी टाकून, हे मात्र स्पष्ट झाले नाही. पंकजकडून दिल्या जाणाऱ्या टीप व यशस्वी होणाऱ्या धाडींमुळे स्थानिक पोलिसांमध्ये मात्र काहिसे अस्वस्थतेचे वातावरण पाहायला मिळते. मात्र, साहेबांच्या गुडबूकमध्ये असल्याने कुणाला काही बोलण्याची सोय नसल्याची अडचणही या कर्मचाऱ्यांकडून मान्य केली जात आहे. पंकजची बुलडाणा जिल्ह्यातून येऊन येथे सुरू असलेली ‘कामगिरी’ स्थानिक पोलिसांना आत्मचिंतन करायला लावणारी ठरली आहे. 

२० लाख गमावलेल्या शिपायाची तर टीप नव्हे? आयपीएल क्रिकेट सट्ट्यात उमरखेड उपविभागात कार्यरत एका पोलीस शिपायाने २० लाख रुपये गमावले. या रकमेची भरपाई त्याला दागदागिने मोडून करून द्यावी लागली. त्याचा वचपा काढण्यासाठी तर त्या पोलीस शिपायाने बुलडाण्याच्या पंकजमार्फत आठवडी बाजारातील डिजिटल क्रिकेट सट्ट्याची टीप दिली नसावी ना, अशी शंका पाेलीस वर्तुळातूनच व्यक्त केली जात आहे. तो पोलीस शिपाई एकेकाळी यवतमाळातील गाजलेल्या ‘९२ डीबी’चा सदस्य राहिलेला आहे. पोलीस खात्यातील अशाच काही महाभागांचे यवतमाळच्या गुन्हेगारीत सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. ते तोडल्याशिवाय येथील गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे रॅकेट पूर्णत: नियंत्रणात येणार नाही, एवढे निश्चित. 

टॅग्स :Policeपोलिस