बुद्ध वंदनेसह बुद्ध अस्थी धातू दर्शन
By Admin | Updated: October 29, 2015 02:53 IST2015-10-29T02:53:09+5:302015-10-29T02:53:09+5:30
येथे दाखल झालेल्या बुद्ध अस्थी धातूंचे हजारो नागरिकांनी दर्शन घेतले. भिक्खु संघाचे अध्यक्ष भदन्त संघानुशासक सदानंद महास्थवीर,

बुद्ध वंदनेसह बुद्ध अस्थी धातू दर्शन
यवतमाळ : येथे दाखल झालेल्या बुद्ध अस्थी धातूंचे हजारो नागरिकांनी दर्शन घेतले. भिक्खु संघाचे अध्यक्ष भदन्त संघानुशासक सदानंद महास्थवीर, भदन्त सुमेधबोधी महाथेरो आणि भिक्खु संघाच्यावतीने बुद्ध वंदनेनंतर नागरिक बुद्ध अस्थी धातूच्या कलशापुढे नतमस्तक झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त बुद्ध अस्थीचे यवतमाळात आगमन झाल्यानंतर शहरातील विविध मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. समता मैदानातील (पोस्टल ग्राऊंड) राष्ट्रीय समता धम्म परिषदेच्या मंचावर बुद्ध अस्थी धातूचा पवित्र कलश ठेवण्यात आला. याठिकाणी बुद्ध वंदना होऊन दर्शन घेण्यात आले.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे अध्यक्ष खासदार रामदास आठवले, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे आदींनी अस्थी धातूंचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्रीलंका येथील पुरातत्त्व विभागाचे डब्ल्यू.बी. वेपिटिया, टी.के. अमरसिंहे, यू.एच. गोडगेदार, दिस्सा नायके आदी उपस्थित होते. सिने कलावंत गगणजी मलीक, दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, नितीन गजभिये, अॅड. भीमराव कांबळे, बौद्ध महासभेचे विदर्भ प्रदेश सरचिटणीस शंकरराव ठेंगरे, मनोहरराव दुपारे, पुरुषोत्तम मेश्राम, अर्जून मेश्राम, रिपाइंचे सुधाकर तायडे, मोहन भोयर, बाळू गावंडे आदी उपस्थित होते.
आयोजनासाठी रिपाइं(ए)चे कार्याध्यक्ष महेंद्र मानकर, बुद्धिस्ट सोसायटीचे सुखदेवराव जाधव, जयकृष्ण बोरकर, जिल्हाध्यक्ष धम्मपाल माने, अरुणा सिरसाट, गोविंद मेश्राम, रामदास बनकर, चंद्रकांत अलोणे, काशीनाथ ब्राह्मणे, उद्धवराव भालेराव, आनंदराव कांबळे, भीमराव काळपांडे, महादेवराव अढावे, सुखदेवराव सिंगारकर, श्रीकांत खोब्रागडे, संतोष जीवने, मंगेश रामटेके, गौतम वाकोडे, किशोर भगत, विनोद थूल, के.के. पाईकराव, ऋषिकेश मनवर, गौतम सोनोने, रूपाताई मानकर, नवनीत महाजन, अॅड. रवींद्र अलोणे, अॅड. धनंजय मानकर, अॅड. राहुल घरडे, अॅड. जयसिंग चव्हाण, अॅड. रजनी मेश्राम, सुजाता मोडक, उषा पारखडे, संगीता चंदनखेडे, पुष्पा मनवर, नागसेन पुडके, देवानंद शेळके, अविनाश भगत, भीमराव सिरसाट, वासनिक, डॉ. प्रदीप मेंढे, संगीता जाधव, रत्ना सिरसाट, प्रा. मधुकर फुलझेले, सखाराम देवपारे, आनंदराव इंगोले, विनोद रंगारी, राहुल तायडे, डी.के. हनवते आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)