‘बीएसएनएल’ने उत्कृष्ठ सेवा द्यावी

By Admin | Updated: November 27, 2015 02:37 IST2015-11-27T02:37:25+5:302015-11-27T02:37:25+5:30

भारत संचार निगम लिमिटेडने यवतमाळ जिल्ह्यातील जनतेला उत्कृष्ठ सेवा द्यावी, त्यासाठी मी यवतमाळ बीएसएनएलच्या पाठीशी आहे.

BSNL should provide excellent service | ‘बीएसएनएल’ने उत्कृष्ठ सेवा द्यावी

‘बीएसएनएल’ने उत्कृष्ठ सेवा द्यावी

विजय दर्डा : यवतमाळ दूरसंचार सल्लागार समितीची सभा
यवतमाळ : भारत संचार निगम लिमिटेडने यवतमाळ जिल्ह्यातील जनतेला उत्कृष्ठ सेवा द्यावी, त्यासाठी मी यवतमाळ बीएसएनएलच्या पाठीशी आहे. यामध्ये कोणत्याही अडचणी असल्या त्या मला सांगाव्या, मी त्या सोडवेन, असे प्रतिपादन लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले.
बुधवारी येथील बीएसएनएल कार्यालयात खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेत दूरसंचार सल्लागार समितीची सभा झाली, यावेळी ते बोलत होते. बीएसएनएलचे महाप्रबंधक अजय सावतकर हे यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना विजय दर्डा म्हणाले, बीएसएनएल हे भारत सरकारचे असल्यामुळे ग्राहकांना ूखूप अपेक्षा आहेत. त्या दृष्टीकोणातून बीएसएनएलने मोबाईल, लँन्डलाईन व ब्रॉडबँन्डमध्ये उत्कृष्ट सेवा ग्राहकांना प्रदान करावी. यवतमाळ जिल्ह्यातील गावागावात योग्य सेवा पोहचविणे बीएसएनएलचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले.
काम करीत असताना जर काही तांत्रिक, विभागीय, शासकीय किंवा वैयक्तिक अडचण येत असेल तर त्या मला सांगा मी स्वत: लक्ष घालून त्या दूर करेल, परंतु ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळालीच पाहिजे, असेही खासदार दर्डा म्हणाले.
बीएसएनएल यवतमाळचे वरिष्ठ महाप्रबंधक अजय सावतकर यांनी यवतमाळ जिल्हा बीएसएनएल विभागाची कामे, स्थिती व राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारा दिली. बीएसएनएल ग्राहकाना लँन्डलाईनवरून रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेत देशातील कोणत्याही भागातील, कोणत्याही कंपनीच्या मोबाईल व लँन्डलाईनवर वर फोन केल्यास पूर्णपणे मोफत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय बीएसएनएल मोबाईल धारकाला संपूर्ण देशात रोमींग फ्री आहे. शेतकऱ्यांसाठी महाकृषी संचार ही योजना आहे. विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अतिशय फायद्याची अशी योजना सुरू करण्यात आल्याची माहिती सावतकर यांनी दिली.
यावेळी दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य विलास देशपांडे, श्रीधर मोहोड, अरुण वाकले, राजेंद्र गिरी आदींनी बीएसएनएनच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक कुसुंगवार, सहाय्यक महाप्रबंधक विजय धामणीकर, अशोक बेंडे, संतोष गादिया, यशवंत तंतरपाळे, मुख्य लेखाधिकारी कानेटकर, उपविभागीय अभियंता रहमान शेकुवाले व उपविभागीय अभियंता शंतनू शेटे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: BSNL should provide excellent service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.