बहिणीच्या मृत्यूप्रकरणी भावाला हवा न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST2021-07-16T04:28:37+5:302021-07-16T04:28:37+5:30

शहरातील दुधे लेआउट येथील रहिवासी शेख आयुब शेख शकूर यांची बहीण संजीदाबी शेख नईम यांचा विवाह २५ वर्षांपूर्वी गढी ...

Brother wants justice in case of sister's death | बहिणीच्या मृत्यूप्रकरणी भावाला हवा न्याय

बहिणीच्या मृत्यूप्रकरणी भावाला हवा न्याय

शहरातील दुधे लेआउट येथील रहिवासी शेख आयुब शेख शकूर यांची बहीण संजीदाबी शेख नईम यांचा विवाह २५ वर्षांपूर्वी गढी वॉर्ड येथील शेख नईम शेख रसूल यांच्यासोबत झाला होता. २ जुलै २०२१ रोजी शेख अय्युब यांची मोठी बहीण महेमुदाबी सय्यद नूर पुसद येथे संजीदाबी यांना भेटावयास गेली. त्यावेळी तिची प्रकृती ठीक नव्हती. ७ जुलै २०२१ रोजी संजीदाबीची प्रकृती खराब असल्याने हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती मिळाल्याने शेख अय्युब तेथे पोहोचले. ११ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.

आपल्या बहिणीच्या मृत्यूस शेख नईम शेख रसूल, शेख मुस्तफा शेख रसूल, शेख फइम शेख नईम, शेख अरबाज शेख नईम हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. अद्याप पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे बहिणीच्या खून प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने तिला न्याय मिळवून देण्यासाठी सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती शेख आयुब शेख शकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Brother wants justice in case of sister's death