शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नरसापुरात तुटल्या पक्षभेदाच्या श्रृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:11 AM

गावगाड्याच्या राजकारणात पक्षीय नेत्यांमधून विस्तवही जात नाही. वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सर्व धन्यता मानतात. मात्र गाव पाणीदार करण्यासाठी याच गावपुढाऱ्यांसह सामान्य ग्रामस्थांनी आता एकमेकांचा हात पकडून खांद्याला-खांदा लावून श्रमदान केल्याचा अनुभाव तालुक्यातील नरसापूर येथे आला.

ठळक मुद्देमहाश्रमदान : पाणीदार गावासाठी नागरिक एकवटले

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गावगाड्याच्या राजकारणात पक्षीय नेत्यांमधून विस्तवही जात नाही. वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सर्व धन्यता मानतात. मात्र गाव पाणीदार करण्यासाठी याच गावपुढाऱ्यांसह सामान्य ग्रामस्थांनी आता एकमेकांचा हात पकडून खांद्याला-खांदा लावून श्रमदान केल्याचा अनुभाव तालुक्यातील नरसापूर येथे आला.नरसापूर येथील ग्राम सुधार समितीतर्फे महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्यासाठी आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, माजी आमदार प्रा. वसंत पुरके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख या परंपरागत विरोधकांनी एकत्र येऊन हातात टिकास, पावडे व टोपले घेत जलसंधारणाचे काम केले. अनेकदा एकमेकांच्या कार्याला विरोध करणाºया या तीन नेत्यांत श्रमदानासाठी झालेली एकी अनेकांना सुखद धक्का देऊन गेली. त्यामुळे गावकरी व बाहेरुन आलेल्या शेकडो लोकांचा उत्साह द्विगुणीत झाला.श्रमदानामध्ये उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, वनपरिक्षेत्राधिकारी नितीन वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, सोनाली चव्हाण, प्राचार्य अविनाश शिर्के, डॉ. विजय कावलकर, प्रा. घनशाम दरणे, नायब तहसीलदार देशपांडे, कहारे, बावणे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, नगरसेवक राजू पड्डा, अशोक उमरतकर, मुन्ना लाखीयाँ, रुपेश राऊत, अशोक बागडे, अर्चना दवारे, योगेश बोटरे यांच्यासह सर्व विभागातील कर्मचारी व हजारो लोकांचा सहभाग होता.अनेकांनी केले सहकुटूंब श्रमदानया महाश्रमदानात प्रवीण देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार भोसले, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांसह अनेकांनी सहपरिवार श्रमदान केले. यामुळे लोकांचा उत्साह आणखी वाढला. श्रमदान सुरू असतानाच मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेलेले जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना नरसापूर येथे महाश्रमदानात हजारो नागरिकांनी सहभाग घेतल्याची माहिती देण्यात आली. डॉ. देशमुख यांनी लगेच संदीपकुमार अपार यांच्या भ्रमणध्वनीवरुन उपस्थितांशी हितगूज केले. गावकऱ्यांच्या कार्याची स्तुती केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच शिवारफेरी काढली होती.