‘वायपीएस’ची चमकदार कामगिरी
By Admin | Updated: September 23, 2016 02:44 IST2016-09-23T02:44:18+5:302016-09-23T02:44:18+5:30
जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने येथील नेहरू स्टेडियमवर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली.

‘वायपीएस’ची चमकदार कामगिरी
यवतमाळ : जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने येथील नेहरू स्टेडियमवर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे जिंकली.
वयोगट १४ मध्ये वेद जोशी, अथर्व केळेकर, सुर्याश शिरभाते, अपूर्वा परसोडकर, सिमरजीत काळे, देवकी परांजिया आणि वयोगट १७ मध्ये विरेन घुईखेडकर, रोहन हिंदूजा, श्रेयस साबू, जान्हवी ठाकरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बक्षिसे पटकाविली. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षिक सुदर्शन महिंद्रे, प्रवीण कळसकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, कार्यकारी प्राचार्य अर्चना कढव, रुक्साना बॉम्बेवाला आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)