लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वत: सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेऊन आयएएस झालेले जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यवतमाळात रुजू होताच त्यांची पहिली नजर जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर गेली. त्यामुळे आल्या-आल्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तम ३२५ शिक्षक निवडून त्यांची ‘ब्रिगेड’ तयार केली आहे. येत्या गुरुवारी जिल्हास्तरीय बैठक घेऊन या शिक्षकांना विशेष ‘टास्क’ दिला जाणार आहे.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांची गुणवत्ता घटत असल्याचे जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आले. मात्र या शाळांमधील अनेक शिक्षक चांगले काम करीत आहेत. त्यांचा उपयोग करून सर्वच शाळांमधील अध्यापन सुधारण्यासाठी सिंह यांनी पाऊल उचलले आहे. गणित, मराठी, इंग्रजी, हिंदी, सामाजिक शास्त्र, विज्ञान या प्रत्येक विषयांचे उत्तम शिक्षक निवडून ३२५ शिक्षकांची ‘शिक्षक ब्रिगेड’ त्यांनी ५ मार्च रोजी स्थापन केली. त्याकरिता प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयाचे ३ उत्तम शिक्षक निवडण्यात आले आहे. मात्र, पुसद तालुक्यातून इंग्रजीचे, सामाजिक शास्त्राचे उमरखेड तालुक्यातून, विज्ञानाचे यवतमाळ तालुक्यातून आणि गणित विषयाचे महागाव तालुक्यातून ४ शिक्षक घेण्यात आले आहे.ब्रिगेड नेमके काय करणार?कोणत्या विषयात विद्यार्थी मागे आहे, याची वर्गनिहाय माहिती गोळी केली जाणार आहे. त्याची कारणे नोंदविली जाणार आहे. त्यानंतर संबंधित विषय अधिक सोपा करून कसा शिकविता येईल, याचे तंत्र या शिक्षकाकडून विचारले जाईल. हे तंत्र त्यांच्या-त्यांच्या तालुक्यातील मागास शाळांतील शिक्षकांना समजावून सांगितले जाईल. त्याच परिसरातील खासगी शाळांमध्ये कोणते अध्यापन तंत्र वापरले जाते, याचा अभ्यास करून जिल्हा परिषद शाळेतही त्याच तोडीचे अध्यापन तंत्र वापरण्यावर भर दिला जाईल.प्रत्येकाला शिकविणार संगणकया ब्रिगेडमध्ये ३३ संगणक शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष संगणकाचे धडे या माध्यमातून दिले जाणार आहे. भविष्यात जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आयटी क्षेत्रासाठीही तयार व्हावे, हा यामागील हेतू असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, या ३२५ शिक्षकांना १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. कोणीही गैरहजर राहता कामा नये, असे आदेश शिक्षणाधिकाºयांनी बजावले आहेत.पदोन्नतीची मिळणार संधीदरम्यान, गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची ब्रिगेड तयार करण्यात आली असली तरी जिल्ह्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह म्हणाले, या ब्रिगेडमध्ये जे शिक्षक चांगले काम करतील, त्यांनाच पुढे ‘मोठी जबाबदारी’ दिली जाईल.मी चंद्रपूर जिल्हा परिषदेत सीईओ असताना अशी ब्रिगेड तयार केली होती. तेथे मला अल्प कालावधी मिळाला. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमध्ये ब्रिगेडद्वारे लवकरच चांगल्या सुधारणा पाहायला मिळतील.- एम. डी. सिंह, जिल्हाधिकारी
नव्या जिल्हाधिकाऱ्यांची ब्रिगेड सुधारणार जिल्हा परिषदेच्या शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांची गुणवत्ता घटत असल्याचे जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आले. मात्र या शाळांमधील अनेक शिक्षक चांगले काम करीत आहेत. त्यांचा उपयोग करून सर्वच शाळांमधील अध्यापन सुधारण्यासाठी सिंह यांनी पाऊल उचलले आहे.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांची ब्रिगेड सुधारणार जिल्हा परिषदेच्या शाळा
ठळक मुद्दे३२५ शिक्षकांची फौज । गुरुवारी देणार ‘टास्क’, प्रत्येक विषयाचे शिक्षक निवडणार