तेलंगणाला जोडणारा पूल वाहून गेला
By Admin | Updated: July 14, 2016 02:39 IST2016-07-14T02:39:24+5:302016-07-14T02:39:24+5:30
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पैनगंगा नदीला पूर आला असून पुरामुळे तेलंगणा व महाराष्ट्राला जोडणाऱ्या दिग्रस येथील पुलाची एक बाजू वाहून गेली आहे.

तेलंगणाला जोडणारा पूल वाहून गेला
पैैनगंगेला पूर : महाराष्ट्रातून तेलंगणात जाणारी वाहतूक ठप्प
पाटण : गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पैनगंगा नदीला पूर आला असून पुरामुळे तेलंगणा व महाराष्ट्राला जोडणाऱ्या दिग्रस येथील पुलाची एक बाजू वाहून गेली आहे. परिणामी महाराष्ट्रातून तेलंगाणात होणारी वाहतूक गेल्या मंगळवारपासून ठप्प झाली आहे.
झरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान होत असून नव्यानेच बांधण्यात आलेला तेलंगणा व महाराष्ट्राला जोडणाऱ्या मोठ्या पुलाचा तेलंगणाकडील भाग पूर्णपणे वाहून गेल्याने या मार्गाने होणारी वाहतूक ठप्प पडली आहे. तेलंगणातील आदिलाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असल्यास या भागातील नागरिकांसाठी अतिशय जवळचा मार्ग आहे.
या मार्गाने प्रवास केल्यास १५ किलोमीटरचे अंतर कमी होते. हा पुल एका बाजुने पूर्णपणे उखडला गेल्याने नागरिकांना १५ किलोमीटरचे जादा अंतर कापून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)