मेट-ढाणकी रस्त्यावरील पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:35+5:302021-07-23T04:25:35+5:30

फोटो ढाणकी : उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते मेट रस्त्यावरील नाल्याचा पूल दुसऱ्यांदा वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प ...

The bridge over the Met-Dhanaki road was carried away | मेट-ढाणकी रस्त्यावरील पूल गेला वाहून

मेट-ढाणकी रस्त्यावरील पूल गेला वाहून

googlenewsNext

फोटो

ढाणकी : उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते मेट रस्त्यावरील नाल्याचा पूल दुसऱ्यांदा वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे.

मुसळधार पावसाने परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. ढाणकी ते मेट या मार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू असून अद्याप पुलाचे काम अपूर्ण आहे. गेल्यावर्षी हाच पूल वाहून गेला होता. त्यामुळे कंत्राटदाराने पावसाळ्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण करावयास हवे होते. मात्र, अद्याप काम सुरूच असल्याने मेट व ढाणकीच्या नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा येत आहे. मेट गावाचा संपर्क तुटला आहे.

बुधवारी पावसाने अर्धवट पुलही वाहून गेला. रस्त्याचे कामसुद्धा संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. मेटप्रमाणेच बंदी भागातील सहस्त्रकुंड-जेवली रोडवरील जेवलीनजीकचा पूलसुद्धा अतिशय लहान आहे. त्यामुळे मुरली, सहस्त्रकुंड या गावांचा संपर्क तुटतो.

220721\img_20210722_082650.jpg

मेट -ढाणकी रस्त्यावरचा पूल गेला वाहून.

पुलाचे काम कासव गतीने चालु.

Web Title: The bridge over the Met-Dhanaki road was carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.