कापड व्यावसायिकाकडे धाडसी चोरी

By Admin | Updated: May 4, 2016 03:26 IST2016-05-04T03:26:20+5:302016-05-04T03:26:20+5:30

येथील गवळीपुरा परिसरातील एका कापड व्यावसायिकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी दीड लाख रोख रकमेसह सोन्याचे दागिने

The brave soldier with the clothes businessman | कापड व्यावसायिकाकडे धाडसी चोरी

कापड व्यावसायिकाकडे धाडसी चोरी

दिग्रस : येथील गवळीपुरा परिसरातील एका कापड व्यावसायिकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी दीड लाख रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. नेमके किती रुपयांचे दागिने गेले हे कळू शकले नाही.
येथील मयूर ड्रेसेसचे संचालक टेकचंद भगवानदास छत्ताणी यांचे गवळीपुरा प्रभागात घर आहे. अमरावती येथे एका लग्न समारंभासाठी सहा जणांचा परिवार सोमवारी गेला होता. त्यामुळे घराला कुलूप होते. या संधीचा फायदा घेत चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कुटुंब प्रमुख टेकचंद छत्ताणी यांच्या खोलीतील कपाट फोडले. या कपाटातील अंदाजे दीड लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केले. विवाह कार्य आटोपून लक्ष्मण टेकचंद छत्ताणी घरी परत आले. तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. प्रत्येक खोलीत जाऊन बघितले असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. या घटनेची तक्रार दिग्रस पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर कुटुंबातील महिला लग्नावरून परत आल्यानंतर नेमका ऐवज किती चोरीस गेला हे कळणार आहे. दिग्रस शहरात गत काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून दररोज कुठे ना कुठे चोऱ्या होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The brave soldier with the clothes businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.