मुलाला ओटीपी मागून ९६ हजार उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 07:00 IST2021-03-03T07:00:00+5:302021-03-03T07:00:06+5:30
Yawatmal news ऑनलाईन शिकवणीसाठी मोबाईल घेऊन बसलेल्या मुलाला तुझ्या वडिलांशी बोलणे झाले, मोबाईलवर आलेला ओटीपी सांग असे म्हणून क्रेडिट कार्डद्वारे बँक खात्यातून ९६ हजार ९७६ रुपये उडविल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी येथे घडली.

मुलाला ओटीपी मागून ९६ हजार उडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ऑनलाईन शिकवणीसाठी मोबाईल घेऊन बसलेल्या मुलाला तुझ्या वडिलांशी बोलणे झाले, मोबाईलवर आलेला ओटीपी सांग असे म्हणून क्रेडिट कार्डद्वारे बँक खात्यातून ९६ हजार ९७६ रुपये उडविल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी येथे घडली. भीमराव दादाजी खोंडे रा. जेएन पार्क लोहारा असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचे सेंट्रल बँक व स्टेट बॅंकेत खाते आहे. एकच मोबाईल नंबर या दोन्ही खात्यांना जोडण्यात आला आहे. त्या माध्यमातून ९६ हजारांनी ही फसवणूक केली गेली.