वाढदिवसाला गेलेला बालक बसखाली चिरडला
By Admin | Updated: February 15, 2015 02:01 IST2015-02-15T02:01:56+5:302015-02-15T02:01:56+5:30
नात्यातील एका मुलाच्या वाढदिवसासाठी आजी-आजोबासोबत गेलेल्या नऊ वर्षीय बालकाचा बसखाली चिरडून करुण अंत झाला.

वाढदिवसाला गेलेला बालक बसखाली चिरडला
यवतमाळ : नात्यातील एका मुलाच्या वाढदिवसासाठी आजी-आजोबासोबत गेलेल्या नऊ वर्षीय बालकाचा बसखाली चिरडून करुण अंत झाला. ही घटना यवतमाळ-अमरावती मार्गावरील ढुमणापूरजवळ शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली.
तुषार अनिल हिवरे असे मृत बालकाचे नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील आनंदवाडी येथील रहिवासी होता. आपले आजोबा दादाराव घुगे रा.संकटमोचन, यवतमाळ यांच्याकडे तो शिकायला होता. तो कमला विद्या मंदिरात तिसऱ्या वर्गात शिकत होता. नात्यातील एका मुलाचा वाढदिवस यवतमाळ नजीकच्या ढुमणापूर देवस्थानवर शनिवारी आयोजित होता. यासाठी तो आपल्या आजी आणि आजोबासोबत तेथे गेला. खेळताना तो अचानक रस्त्यावर धावत आला. अमरावतीकडून येणाऱ्या बस (एम.एच.४०/एन-८२६२) च्या खाली येवून चिरडला गेला. घटनेनंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.