बोदाड बेड्याचा पाणीप्रश्न मिटणार

By Admin | Updated: May 11, 2014 00:42 IST2014-05-11T00:42:02+5:302014-05-11T00:42:02+5:30

मारेगाव तालुक्यातील बोदाड येथील पारधी बेड्यावरील अज्ञात आजार आणि पाणी समस्या, या संदर्भात ‘लोकमत’ने ५ आणि ७ मे रोजी वृत्त प्रकाशित ...

Bottom bed water question will be erased | बोदाड बेड्याचा पाणीप्रश्न मिटणार

बोदाड बेड्याचा पाणीप्रश्न मिटणार

मार्डी : मारेगाव तालुक्यातील बोदाड येथील पारधी बेड्यावरील अज्ञात आजार आणि पाणी समस्या, या संदर्भात ‘लोकमत’ने ५ आणि ७ मे रोजी वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता बेड्यावर पाणी समस्या सोडविण्यासाठी दुसर्‍या हातपंपाची व्यवस्था करणार असल्याची ग्वाही आमदारांनी दिली आहे. बोदाड येथील पारधी बेड्याचे वास्तव ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. तेथील पाणी समस्या आणि अज्ञात आजाराची लागण, याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतरही प्रशासन मूग गिळून गप्पच दिसत आहे. मात्र आमदार वामनराव कासावार यांनी या वृत्ताची दखल घेत तातडीने शुक्रवारी पारधी बेडे गाठले. त्यांच्या समवेत अ‍ॅड़भास्कर ढवस, अरूणा खंडाळकर यांनीही पारधी बेड्याला भेट दिली़ तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदारांनी येत्या चार दिवसांत तेथे दुसरा हातपंप सुरू करण्याबाबत कारवाई करण्याची ग्वाही दिली. बेड्यावर दुसर्‍या हातपंपाची व्यवस्था होईपर्यंत, बेड्यालगतच्या मत्ते यांच्या शेतातील बोअरवेल अधिग्रहित करून तेथून पाईपद्वारा या बेड्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे बेड्यावरील रहिवासींनी सांगितले़ तसेच आमदार येणार असल्याचे कळताच आरोग्य विभागाचे अधिकारीही खडबडून जागे झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉग़ावंडे, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक़दम, डॉ़अडाणे हे बेड्यावर चमूसह उपस्थित झाले़ त्यांनी रूग्णांची पाहणी करून मार्गदर्शन केले़ ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरून दुसर्‍या हातपंपाची त्वरित व्यवस्था व्हावी, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे. सोबतच बेड्यावर आरोग्य विषयक सुविधा, औषधोपचार व्हावा, अशी मागणी आहे. या समस्या सोडविण्यासाठी केगावचे सरपंच पिंपळशेंडे, सदस्य, बोदाडचे सदस्य मोहन जोगी प्रयत्नशील आहे़ (वार्ताहर)

Web Title: Bottom bed water question will be erased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.