वाहनाव्दारे निर्जनस्थळी नेऊन महिलेवर दोघांचा अत्याचार
By Admin | Updated: December 13, 2014 02:35 IST2014-12-13T02:35:58+5:302014-12-13T02:35:58+5:30
घाटंजीहून यवतमाळ येथे जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेला व्हॅनमध्ये बसवून तिला निर्जनस्थळी नेण्यात आले.

वाहनाव्दारे निर्जनस्थळी नेऊन महिलेवर दोघांचा अत्याचार
घाटंजी : घाटंजीहून यवतमाळ येथे जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेला व्हॅनमध्ये बसवून तिला निर्जनस्थळी नेण्यात आले. त्यानंतर तिला मारहाण करून दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास खापरी शिवारातील कान्होबा टेकडी परिसरात घडली.
अशोक साहेबराव नील (२८) रा. यवतमाळ आणि गोपाळ दादाराव सुकटे (३८) रा. खापरी अशी अटकेतील नराधमांची नावे आहेत. गुरूवारी सकाळी घाटंजी येथील एक ४० वर्षीय महिला यवतमाळ येथे जाण्यासाठी निघाली. यावेळी ती गोपाळ सुकटे याच्या प्रवासी व्हॅन (एमएच २२ एच २८८१) मध्ये बसली. तिला यवतमाळला न पोहोचविता संबंधित दोघांनी तिला खापरी शिवारातील कान्होबा टेकडी परिसरातील निर्जनस्थळी नेले. त्यानंतर तिला मारहाण करून बळजबरीने अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले.
घटनेनंतर पीडित महिलेने घाटंजी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून संबंधित दोघांविरुद्ध भादंवि ३७६, ३४ कलमान्वये बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान शुक्रवारी सकाळी या दोन्ही आरोपींना ठाणेदार भरत कांबळे यांच्या नेतृत्वातील पथकाने अटक केली. तसेच घटनेत वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले. अटकेतील आरोपींना न्यायालयापुढे हजर करून कोठडी मागणार असल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. या घटनेची वार्ता शहरात पसरताच उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (तालुका प्रतिनिधी)