शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथामुळे ज्ञानाच्या श्रीमंतीमध्ये भर - पालकमंत्री मदन येरावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:30 IST

समाजात वाचन संस्कृती रुजावी, यात नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने शासनाने सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे. ग्रंथोत्सव हा त्यापैकी एक उत्सव म्हणून गत काही वर्षांपासून यशस्वीरित्या साजरा होत आहे.

यवतमाळ : समाजात वाचन संस्कृती रुजावी, यात नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने शासनाने सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे. ग्रंथोत्सव हा त्यापैकी एक उत्सव म्हणून गत काही वर्षांपासून यशस्वीरित्या साजरा होत आहे. नागरिक ग्रंथोत्सवाची वाट बघत असतात. आयुष्याला दिशा देण्याचे काम ग्रंथांमुळे होत असून त्यामुळे ज्ञानाच्या श्रीमंतीमध्ये भर पडते, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगर भवन येथे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, ग्रंथालय सहायक संचालक जगदीश पाटील, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शेंडगे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आर.आर. राऊत, सहकार्यवाहक विनोद देशपांडे आदी उपस्थित होते.ग्रंथ हे गुरुस्थानी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, वाचनाने मानवी जीवनावर संस्कार घडत असतात. त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते. जीवनाचा सार ग्रंथामध्ये आहे. श्रीकृष्णाने अर्जुनासाठी लिहिलेली भगवतगीता आजच्याही युगात महत्वाची वाटते. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विलियम्स्‍ अंतराळात गेली तेव्हा तिच्या हातात भगवतगीता होती. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर विकत घेतले होते, असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, वाचन ही एक कला आहे. मात्र तिचा नियमित सराव केला पाहिजे. वाचन हा बुध्दीचा आहार आहे. त्यामुळे पुस्तकाशी नाते जोडा. समाजात वाचन संस्कृती प्रभावीपणे वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जवळपास सहा कोटी रुपये खर्च करून येथे बांधण्यात येणारे अत्याधुनिक वाचनालय चार-पाच महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुढील महिन्यात 92 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे होत आहे. सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचे गाव असलेल्या भिलारच्या धर्तीवर येथील प्रत्येक तालुका स्तरावर पुस्तकाचे गाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच साहित्य संमेलनात सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी बोलतांना नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या, शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर भवनात हा ग्रंथोत्सव आयोजित केला जातो. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे. वाचनानंतर पुस्तकातील गोष्टी आचारणात आणा. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने येथे साकारण्यात येणारे अत्याधुनिक वाचनालयाला पालिकेने त्वरीत जागा उपलब्ध करून दिली. या वाचनालयामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.तत्पूर्वी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांच्या उपस्थितीत शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने यांनी केले. संचालन प्रा. राजेश चव्हाण यांनी तर आभार गजानन कासावार यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ