देशी कट्ट्याच्या धाकावर बोलेरो वाहन पळविले

By Admin | Updated: August 31, 2014 00:07 IST2014-08-31T00:07:05+5:302014-08-31T00:07:05+5:30

धनोडा टी-पॉइंटवर असलेल्या हॉटेल व्यावसायीकावर क्षुल्लक कारणातून अज्ञात पाच ते सहा युवकांनी चाकू हल्ला केला. त्यानंतर बोलेरो गाडीच्या चालकाला देशीकट्ट्याचा धाक दाखवून या

Bolero driving the vehicle to the hold of the country's cut-off | देशी कट्ट्याच्या धाकावर बोलेरो वाहन पळविले

देशी कट्ट्याच्या धाकावर बोलेरो वाहन पळविले

महागाव : धनोडा टी-पॉइंटवर असलेल्या हॉटेल व्यावसायीकावर क्षुल्लक कारणातून अज्ञात पाच ते सहा युवकांनी चाकू हल्ला केला. त्यानंतर बोलेरो गाडीच्या चालकाला देशीकट्ट्याचा धाक दाखवून या आरोपींनी यवतमाळच्या दिशेन पलायन केले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता धनोडा फाट्यावर घडली. अतुल नारायण दरणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी या अज्ञात युवकांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पाच ते सहा आरोपी हे नांदेडवरून यवतमाळ येथे जात होते. दरम्यान चहा घेण्यासाठी धनोडा येथे थांबले असताना तेथील हॉटेल व्यवसायिक नारायण दरणे यांना त्यांनी यवतमाळच्या तिकीटची विचारपूस केली. तेवढ्यात नांदेडवरून आलेल्या नव्या कोऱ्या क्रमांक नसलेल्या बोलेरो गाडीचा चालकसुद्धा चहा घेण्यासाठी तेथे थांबला. यावेळी तिकीटाच्या क्षुल्लक कारणावरून भडकलेल्या अज्ञात आरोपींनी दरणे यांना शिविगाळ करणे सुरू केले. दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू असताना दरणे यांच्या मुलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी अतुल दरणे यांच्या पोटावर चाकूचा वार केला. हा वार दरणे यांनी चुकविला. परंतु झटापटीत चाकू त्यांच्या मांडीवर लागला. यातील एकाने देशीकट्टा काढून धमकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चाकू व देशी कट्टा निघाल्याने तेथे उपस्थित सर्वच जण घाबरले. तेवढ्यात आरोपींनी बोलेरो गाडी चालकास चाकूचा धाक दाखवून त्याचे वाहन यवतमाळच्या दिशेने नेण्यास त्याला भाग पाडले. याप्रकरणी दरणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक ठाणेदार सचिन चरडे आरोपींचा शोध घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Bolero driving the vehicle to the hold of the country's cut-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.