बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 03:03 IST2015-08-25T03:03:24+5:302015-08-25T03:03:24+5:30

अनियंत्रित बोलेरो जीपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर दुसरा

Bolero drift biker killed young people | बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

यवतमाळ : अनियंत्रित बोलेरो जीपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना येथील दारव्हा नाक्याजवळील रेल्वे क्रॉसिंगवर रविवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.
लखन सतीश अग्रवाल (२२) रा. खामगाव जि. बुलडाणा असे मृताचे नाव आहे. तर सागर अनंतराव सव्वालाखे (२५) रा. नेहरुचौक यवतमाळ असे जखमीचे नाव आहे. लखन हा व्यावसायिक शिक्षणासाठी गत पाच वर्षांपासून यवतमाळात आत्या राधा कमलकिशोर चोखाणी यांच्याकडे राहत होता. रविवारी मित्र सागर सव्वालाखे सोबत तो दुचाकीने (एम.एच.२९-एसी-५९९९) घराकडे जात होता. त्यावेळी दारव्हा नाक्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर समोरुन बोलेरो एम.एच.१५-ईपी-२८६६ ने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकी बोलेरोच्या खाली चिरडल्या गेली. यात लखनच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर जखमी अवस्थेत सागरला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी जितेंद्र कमलकिशोर चोखाणी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून बोलेरो जीप चालक संदीप लालसिंग रघुवंशी (३६) रा. येवदा ता. दर्यापूर जि. अमरावती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप हा एका बियाणे कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून तो यवतमाळवरून यवतमाळकडे जात होता. लखन अग्रवालचे शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खामगाव येथे नेण्यात आला. तो खामगाव येथील अग्रवाल कोल्ड्रींगस्चे संचालक सतीश अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याच्या मागे दोन बहिणी आहे. या घटनेने यवतमाळात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Bolero drift biker killed young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.