बोगस डॉक्टरांकडून चष्मे विक्रीचा गोरखधंदा

By Admin | Updated: September 15, 2014 00:25 IST2014-09-15T00:25:38+5:302014-09-15T00:25:38+5:30

तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बाहेर जिल्ह्यातील बोगस नेत्र चिकित्सक डॉक्टराची टोळी सक्रिय होऊन शिबिराच्या नावावर ग्रामीण भागातील रुग्णांच्या मस्तकी चष्मा देण्याचा

A bogus doctor's brochure sale of glasses | बोगस डॉक्टरांकडून चष्मे विक्रीचा गोरखधंदा

बोगस डॉक्टरांकडून चष्मे विक्रीचा गोरखधंदा

सुधाकर अक्कलवार ल्ल घाटंजी
घाटंजी : तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बाहेर जिल्ह्यातील बोगस नेत्र चिकित्सक डॉक्टराची टोळी सक्रिय होऊन शिबिराच्या नावावर ग्रामीण भागातील रुग्णांच्या मस्तकी चष्मा देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रथमत:च निसर्गाच्या लहरीपणाने मेटाकुटीस आलेल्या ग्रामीण रुग्णांच्या जिवाशी बाहेर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर येऊन फसगत करत आहे. कोणतीही शासकीय आरोग्य विभागाची परवानगी नसताना खेडोपाडी जाऊन स्थानिक एखाद्या इसमाला हाताशी धरून खुलेआम शिबिर लावून त्यात मनमानी तपासणी फी आकारत आहे. त्यानंतर चष्म्याची आवश्यकता आहे असे सांगत वाटेल तसे ३०० ते ६०० रुपयापर्यंत चष्मा घ्यावयास भाग पाडत आहे. यात ग्रामीण जनतेची चांगलीच फसगत झाल्याची चर्चा असून आरोग्य विभाग मात्र गप्प बसले आहे. तालुक्याबाहेरील आकपुरी, येळाबारा येथे हा गोरखधंदा चालविल्यानंतर या टोळीने घाटंजी तालुक्यातील हिवरधरा, मोवाडा, किन्ही येथे शिबिर घेतले. या दरम्यान चांगलीच रुग्णांची फसगत झाल्याची चर्चा असून कोणत्याही प्रकारची पक्की पावती देत नसल्याचे बोलल्या जात आहे.
नेत्र हा मानवी शरीराचा गरजवंत अवयव असतानासुद्धा आम्ही एका संस्थेकडून जनसेवा करीत असल्याची बतावणी करीत खुलेआम ग्रामीण जनतेचा पैसा उकळत आहे. तर बहुतांश रुग्णांकडून तुमच्या नंबरचा चष्मा बनवून आणतो असे सांगून अ‍ॅडव्हांस पैसे काढून नेत आहे. या बाबत काही सुज्ञ नागरिकांनी विचारले असता ते आपल्या खास शैलीत सांगून आम्हाला आपण विचारणार कोण, आम्हाला वरिष्ठांची परवानगी आहे. आपण आम्हाला अडथळा निर्माण केल्यास महागात पडेल असे बोलत असल्याचे सुज्ञ नागरिक फालतू भानगडीत का पडायचे या विवंचनेत वावरत असल्याने या बोगस डॉक्टरांचा चांगलाच जम बसला असून हा प्रकार नेमका काय असावा या बाबत खुलासा करण्यास दुजावत आहे. या शिबिरादरम्यान आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी नसल्याने या शिबिरावर शंका निर्माण झाली असून अशा बोगस डॉक्टरांची शहानिशा करणे गरजेचे आहे. यावर आरोग्य विभाग लक्ष पुरवतील काय, अशी जनमाणसात चर्चा होत आहे. गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे टोळके त्यांची फसवणूक करीत आहे. त्याबाबत प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे.

Web Title: A bogus doctor's brochure sale of glasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.