‘त्या’ बोगस डॉक्टरला अखेर केले निलंबित

By Admin | Updated: July 10, 2015 02:27 IST2015-07-10T02:27:12+5:302015-07-10T02:27:12+5:30

राळेगाव तालुक्यात कार्यरत असलेला आरोग्यसेवक निळकंठ नारायण वसाड याला अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करताना कळंब येथे रंगेहात पकडण्यात आले होते.

'That' bogus doctor finally suspended | ‘त्या’ बोगस डॉक्टरला अखेर केले निलंबित

‘त्या’ बोगस डॉक्टरला अखेर केले निलंबित

कळंब : राळेगाव तालुक्यात कार्यरत असलेला आरोग्यसेवक निळकंठ नारायण वसाड याला अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करताना कळंब येथे रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला गुरूवारी त्याला निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्याचे मुख्यालय मार्डी(ता.मारेगाव) हे राहणार आहे.
वसाड याच्या खासगी दवाखान्यामधून मोठ्या प्रमाणात शासकीय औषधी मिळून आली होती. परिणामी त्याचेवर पोलीस कारवाईसुद्धा करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता स्वत: जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आरोग्य यंत्रणेला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रकरणाचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी राठोड यांनी मागविला. अहवालात नमूद केल्यानुसार त्याचेजवळून ७० च्यावर विविध आजारांवरील शासकीय औषधी आढळून आली. त्यामुळे निळकंठ वसाड याला निलंबित करण्यात आल्याची माहिती डॉ राठोड यांनी दिली. हा प्रकार अतिशय गंभीर असून यांची सखोल चौकशी करण्यासंबधी पोलिसांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहितीही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांचा तपास जैसे-थे
प्रकरणाचा तपास एपीआय भगत यांचेकडे आहे. परंतु सदरची शासकीय औषधी कुठून आणण्यात आली. ती कशी आणण्यात आली. यासाठी कोणाचे सहकार्य मिळाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'That' bogus doctor finally suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.