इतरांच्या दु:ख, वेदनांवर फुंकर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:47 IST2017-09-02T20:47:15+5:302017-09-02T20:47:32+5:30

इतरांच्या दुख: व वेदनांवर फुंकर घालणे हाच इस्लामचा खरा संदेश असल्याचे प्रतिपादन मौलाना काजी अबुजफर यांनी केले.

Blow others with grief and pain, blow them on pain | इतरांच्या दु:ख, वेदनांवर फुंकर घाला

इतरांच्या दु:ख, वेदनांवर फुंकर घाला

ठळक मुद्देइस्लामचा संदेश : मौलाना काजी अबुजफर यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : इतरांच्या दुख: व वेदनांवर फुंकर घालणे हाच इस्लामचा खरा संदेश असल्याचे प्रतिपादन मौलाना काजी अबुजफर यांनी केले. येथील ईदगाहवर शनिवारी सकाळी १० वाजता ईदनिमित्त विशेष नमाज अदा झाल्यानंतर उपस्थितांना उद्देशून ते बोलत होते.
ईद-उल-अजहा म्हणजे संपूर्ण मानव जात व विश्वाच्या कल्याणासाठी सुख, सोयी, सुविधा, संपत्ती व इतर प्रिय वस्तूंचा बलिदान व त्याग करणे होय. केवळ स्वत: आनंद, सुख न उपभोगता इतरांच्या मागार्तील काटे वेचणे, गरजूंना मदत करणे, त्यांच्या कल्याणासाठी धडपडणे, हाच इस्लामचा संदेश असल्याचे मत मौलाना काजी अबुजफर यांनी व्यक्त केले. त्यांनी ईदची पार्श्वभूमी, इस्लामी इतिहास व जगाला सध्या भेडसावणाºया विविध समस्यांवर विचार व्यक्त केले.
याप्रसंगी देशाची एकता व अखंडतेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी तहसीलदार किशोर बागडे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, किशोर कांबळे, नगरपरिषदेचे आरोग्य सभापती जावेद पहेलवान, शिक्षण सभापती सैय्यद अकरम, जावेद पटेल, मेमन समाजाचे हाजी हारून इसानी, मजहर अहमद खान, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक, पुंडलिक वानखडे, नीळकंठ चव्हाण आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदींसह समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.

 

Web Title: Blow others with grief and pain, blow them on pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.