शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

खर्षी येथे आढळले रक्तचंदनाचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:26 PM

महाराष्ट्रात दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचे झाड वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्व मार्गाच्या कामामुळे तालुक्यातील खर्षी येथे प्रकाशात आले असून रक्तचंदनाचे झाड असल्याचे शिक्कामोर्तब वन विभागाने केले आहे. त्यामुळे या वृक्षाला पाहण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी केली आहे.

ठळक मुद्देबहुमूल्य वनस्पती : झाड पाहण्यासाठी शेतात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : महाराष्ट्रात दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचे झाड वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्व मार्गाच्या कामामुळे तालुक्यातील खर्षी येथे प्रकाशात आले असून रक्तचंदनाचे झाड असल्याचे शिक्कामोर्तब वन विभागाने केले आहे. त्यामुळे या वृक्षाला पाहण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी केली आहे.खर्षी येथील शेतकरी पंजाबराव केशवराव शिंदे यांच्या शेतातून रेल्वे मार्ग जात आहे. भुसंपादनाचे काम सुरु असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांचे एक वृक्षाने लक्ष वेधून घेतले. रक्तचंदनाचे झाड असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून ही माहिती पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांना दिली. त्यांनी या वृक्षाची पाहणी केली. तसा अहवाल आंध्रप्रदेशातील मुख्य वनसंरक्षणाकडे पाठविला. त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनीही झाडाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला.रक्तचंदनाचे झाड महाराष्टÑात आढळत नाही परंतु आंध्रप्रदेशात रक्तचंदन आढळते. त्यामुळे या झाडाची खात्री करण्यासाठी अहवाल पाठविण्यात आला होता. सदर झाडाचे वजन अर्धा टन आहे. बाजारपेठेत रक्तचंदन मोठ्या किंमतीला विकले जाते. अभावाने दिसणारा रक्तचंदनाचा वृक्ष पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रक्तचंदनाला मोठी मागणी असून त्याला भरपूर किमत येत असल्याचे सांगितलेसुरक्षेसाठी उपाय योजनाबहुमूल्य रक्तचंदनाचे झाड कोणी तोडून नेऊ नये म्हणून शेतकरी पंजाबराव शिंदे यांनी सुरक्षेच्या उपाय योजना केल्या आहे. तसेच या झाडापासून आपल्याला आर्थिक प्राप्ती होईल असेही त्यांनी सांगितले.