सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदान

By Admin | Updated: July 7, 2016 02:39 IST2016-07-07T02:38:38+5:302016-07-07T02:39:17+5:30

सिकलसेलचा रुग्ण म्हटले की नातेवाईकांना सर्वप्रथम रक्ताची जमवाजमव करावी लागते. यात त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागते.

Blood donation for sick patients | सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदान

सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदान

५१ रक्तदाते : पुसद येथील ब्लड लाईनचा पुढाकार
पुसद : सिकलसेलचा रुग्ण म्हटले की नातेवाईकांना सर्वप्रथम रक्ताची जमवाजमव करावी लागते. यात त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागते. हा प्रकार कुणासोबतही होवू नये म्हणून खास सिकलसेल रुग्णासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी ५१ जणांनी रक्तदान केले.
ब्लड लाईन डायरी व विजय भेलके मित्रमंडळाच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, जयवंतराव पाटील कामारकर, डॉ.सुधीर झिलपिलवार, डॉ.सुप्रिया चिद्दरवार, डॉ.सतीश चिद्दरवार, राजेश आसेगावकर उपस्थित होते.
ब्लड लाईन डायरीच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या शिबिरात सपना आसेगावकर, शक्ती आसेगावकर, बिपीन चिद्दरवार, राजू राठोड, निखिल राठोड, मनोज मेरगेवार, किशोर पजगाडे, राहुल कांबळे, अजमत खान, राहुल खंडारे, अमोल कांबळे, राजेंद्र पुरी, पवन धरणकर, विशाल नेवारे, नंदू आडे, मनीषा ठाकरे आदी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिकलसेलग्रस्तांना रक्त मोफत लावून देण्याची व्यवस्था डॉ.भानुप्रकाश कदम व डॉ.संजय भांगडे यांच्याकडे विनामूल्य करण्यात आली आहे. कार्यक्रमाला जयंत चिद्दरवार, अ‍ॅड.अतुल चिद्दरवार, राजू जयस्वाल, अमर आसेगावकर, संदीप जिल्लेवार, सुरज डुबेवार, बाळाभाऊ सोमावार, गिरीश अनंतवार, डॉ.सतीश चिद्दरवार, विजय भेलके, संजय रेक्कावार, प्रकाश भोसले, दिलीप खैरे, रवी तायडे, विष्णू धुळे, शेख सलिम, नितीन जाधव, विनोद जाधव, लकी राठोड, गजानन पाचंगे, नीलेश दंतवार, शेख सलिम, राजू मोगरे, प्रशांत गव्हाणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Blood donation for sick patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.