‘जेडीआयईटी’मध्ये रक्तदान शिबिर
By Admin | Updated: February 15, 2016 02:36 IST2016-02-15T02:36:23+5:302016-02-15T02:36:23+5:30
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथक व रोटरी क्लब यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

‘जेडीआयईटी’मध्ये रक्तदान शिबिर
यवतमाळ : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथक व रोटरी क्लब यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेत झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, सचिव डॉ. संजय गुल्हाने, राजेश गढीकर, डॉ. सुरेंद्र पद्मावार, माजी अध्यक्ष अशोक कोठारी, देवीदास गोपलानी, सतीश फाटक, रासेयो क्षेत्रीय समन्वयक प्रा. सचिन अस्वार, प्रा. पंकज पंडित, प्रा. गणेश काकड आदी उपस्थित होते.
या शिबिरात २३० जणांनी रक्तदान केले. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग होता. रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे डॉ. स्वाती शेंडे, अनिल पिसे, कुचनकर, राहुल भोयर, प्रदीप वाघमारे, नीलकंठ जवंजाळ, परमेश्वर चव्हाण, संजय नेमाडे, सचिन सोनवाल, रामभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. आशीष माहुरे, प्रा. पायल पावडे, प्रा. रणजित शेंडे, प्रा. विद्याशेखर, प्रा. जिरापुरे, प्रा. शिरभाते, प्रा. राठोड, प्रा. कुंभलकर, रासेयो स्वयंसेवक तेजस कापसे, प्रतीक शिरभाते, आदित्य चौधरी, शुभम गावंडे, अश्विन वैद्य, संकेत कोल्हे, अनिकेत गिरी, सायली तिन्खेडे, ढोरे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांसह रोटरी क्लब यवतमाळचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)