आर्णी येथे महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:48 IST2021-08-13T04:48:17+5:302021-08-13T04:48:17+5:30
आर्णी : क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आर्णी येथे आर्णी-केळापूर विधानसभा काँग्रेसच्या वतीने महारक्तदान शिबिर घेण्यात आले. जितेंद्र ...

आर्णी येथे महारक्तदान शिबिर
आर्णी : क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आर्णी येथे आर्णी-केळापूर विधानसभा काँग्रेसच्या वतीने महारक्तदान शिबिर घेण्यात आले.
जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वाखाली महारक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात १६५ जणांनी रक्तदान केले. कारगिल विजय दिवस ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या या शिबिराच्या शृंखलेत अनेक लोकांनी रक्तदान केले. येथे पार पडलेल्या शिबिराला जितेंद्र मोघे, माजी नगराध्यक्ष आरीज बेग, माजी उपनगराध्यक्ष राजू विरखडे, तालुकाध्यक्ष सुनील भारती, राजू गावंडे, छोटू देशमुख, जावेद सोलंकी, कादर इसानी, अमोल मांगुळकर, अतुल देशमुख, शेख युनूस, रिजवान बेग, नितेश बुटले, सुनील गेडाम, प्रदीप भगत, प्रसंजीत खंडारे, तन्मय बागुल, दत्ता हुलगुंडे, कुणाल भगत, प्रसंजीत पुनवटकर, गजानन शेळके आदी उपस्थित होते.