आर्णी येथे १३७ जणांचे रक्तदान
By Admin | Updated: October 7, 2015 02:56 IST2015-10-07T02:56:43+5:302015-10-07T02:56:43+5:30
साध्वी शताब्दीप्रभा यांच्या प्रथम दीक्षा दिनानिमित्त आर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आर्णी येथे १३७ जणांचे रक्तदान
विविध कार्यक्रम : साध्वी शताब्दीप्रभाचा प्रथम दीक्षा दिन
आर्णी : साध्वी शताब्दीप्रभा यांच्या प्रथम दीक्षा दिनानिमित्त आर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १३७ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. तसेच प्रथम दीक्षा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
येथील देवराव पाटील शिंदे महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी या रक्तदान शिबिराचे आयोजन छल्लाणी परिवाराच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्रवीण अलिझार, श्रीमाल कोठारी, अजय छल्लाणी, स्वप्नील दुग्गड आदी उपस्थित होते. कार्यक्रमात साध्वी शताब्दीप्रभा यांचे आजोबा भंवरीलाल छल्लाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप छल्लाणी, अशोक छल्लाणी, शीतल कोठारी, अनुप कोठारी, किरण पाटील, गोपाल कोठारी, प्रमोद बुटले आदी उपस्थित होते. गतवर्षी येथील छल्लाणी परिवारातील कविता यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. त्या साध्वी शताब्दीप्रभा झाल्यात. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाल्याने महाप्रसादासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)