वाघदरात मेव्हण्याने केला जावयाच्या प्रेयसीचा खून

By Admin | Updated: February 21, 2016 01:53 IST2016-02-21T01:53:11+5:302016-02-21T01:53:11+5:30

बहिणीच्या संसारात अडथळा ठरत असलेल्या जावयाच्या प्रेयसीचा गळा आवळून खून करण्यात आला.

The blood of the bearded blood of the wagon | वाघदरात मेव्हण्याने केला जावयाच्या प्रेयसीचा खून

वाघदरात मेव्हण्याने केला जावयाच्या प्रेयसीचा खून

मारेगाव : बहिणीच्या संसारात अडथळा ठरत असलेल्या जावयाच्या प्रेयसीचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील वाघदरा येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली. अन्नपूर्णा ज्ञानेश्वर टेकाम (२८) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रकरणी रत्नाकर भीमराव टेकाम (२३) व संतोष दादाराव आत्राम (२०) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोषला अटक करण्यात आली तर रत्नाकर पसार आहे.
परितक्त्या असलेल्या अन्नपूर्णाशी संबंध असल्यामुळेच जावई आपल्या बहिणीला मारहाण करतो असा भावांचा संशय होता. त्यामुळे अन्नपूर्णाला संपविण्याचा निर्णय भावांनी घेतला. शुक्रवारी सायंकाळी अन्नपूर्णा ही शौचास गेली. रत्नाकर टेकाम व संतोष आत्राम यांनी तिला पुलाखाली ओढत नेत मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. काही ग्रामस्थ या भागात असल्याने सदर प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी रत्नाकर व संतोष यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पसार रत्नाकरचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे दुर्गम भागात असलेल्या वाघदरा या गावात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The blood of the bearded blood of the wagon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.