हिवरी येथे अंध तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: May 16, 2016 02:37 IST2016-05-16T02:37:02+5:302016-05-16T02:37:02+5:30

परिस्थितीपुढे हतबल झालेल्या एका अंध तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.

Blind victim's suicide in Hivi | हिवरी येथे अंध तरुणाची आत्महत्या

हिवरी येथे अंध तरुणाची आत्महत्या

परिस्थितीपुढे हतबल : पोलिसांची दिरंगाई
हिवरी : परिस्थितीपुढे हतबल झालेल्या एका अंध तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. सदर इसम अविवाहित असून तो आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता.
अशोक बापुराव राऊत (४०) रा. हिवरी असे मृताचे नाव आहे. आर्थिक परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने अशोक गावातील चक्कीवर पीठ मागून चरितार्थ चालवित होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या आईला जबरदस्तीने मनदेव येथील एका लग्न सोहळ्यात पाठविले. इकडे त्याने घराला नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच नागरिकांनी त्याच्याकडे धाव घेतली. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. दुपारी माहिती दिल्यानंतरही रात्री ७.३० वाजेपर्यंत यवतमाळ ग्रामीण पोलीस पोहोचले नव्हते. अशोकचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत होता. त्याच्या घरापुढे गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांप्रती गावकरी रोष व्यक्त करीत होते. अंध अशोकच्या मृत्यूनंतरही पोलीस वेळेवर पोहोचले नाही. (वार्ताहर)

लोहारा येथे आत्महत्या
यवतमाळ : शहरातील लोहारा येथील रेमण्ड कॉलनी परिसराच्या मागे एका इसमाचे गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. किसन पुनाजी थोंबे (५५) रा. साईनगर असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री त्याने पळसाच्या झाडा दोन बांधून आत्महत्या केली असवी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

Web Title: Blind victim's suicide in Hivi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.