आमदाराच्या गावात भाजपाची सरशी

By Admin | Updated: May 25, 2014 23:56 IST2014-05-25T23:56:10+5:302014-05-25T23:56:10+5:30

नुकत्याच झालेल्या सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत वणी विधानसभा मतदार संघात भाजपाला अनपेक्षित अशी ५४ हजार मतांची आघाडी मिळाली. मोदी लाट व काँग्रेसबद्दल मतदारांच्या मनात असलेली चीड, मतदान यंत्राच्या

BJP's Sarasi in the town of the MLA | आमदाराच्या गावात भाजपाची सरशी

आमदाराच्या गावात भाजपाची सरशी

विनोद ताजने - वणी

नुकत्याच झालेल्या सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत वणी विधानसभा मतदार संघात भाजपाला अनपेक्षित अशी ५४ हजार मतांची आघाडी मिळाली. मोदी लाट व काँग्रेसबद्दल मतदारांच्या मनात असलेली चीड, मतदान यंत्राच्या बटणवर उमटली. आश्‍चर्य म्हणजे येथील काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांच्या पाटण या गावातच चक्क भाजपा उमेदवाराला मतांची आघाडी मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील ३0७ केंद्रापैकी केवळ ३0 केंद्रांवर काँग्रेसला किंचित आघाडी मिळाली, तर आपला केवळ १४ केंद्रांवरच बढत मिळाली आहो. त्यामुळे आगामी विधानसभा लक्ष्य ठेवून काँग्रेसच्या नेत्यांना चिंतनकरावे लागणार आहे. यावेळी सर्वत्र मोदींची लाट होती. मतदारांना विकासमेरूहवा होता. काँग्रेसची चुकीची ध्येयधोरणे जनतेला मारक ठरत असल्याचा अनुभव जनतेला येत होता. भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी पाच वर्षांत ठेवलेला दांडगा जनसंपर्क दुधात साखर घालणारा ठरला. वणी विधानसभा मतदार संघ धनोजे कुणबी समाजाचा वरचष्मा दाखवेल, ही भ्रामक कल्पनाही मतदारांनी फोल ठरविली. परिणामी वामनराव चटप तिसर्‍या स्थानावर फेकले गेले. साहेब, आमच्या गावाबाबत निर्धास्त रहा’, असे ठणकावून सांगणार्‍या कार्यकर्त्यांनाही तोंडबुचक्या पडावे लागले. खुद्द आमदार वामनराव कासावार यांच्या पाटण गावात भाजपाला १९३ मतांची आघाडी मिळाली. यामुळे सर्वसाधारण कार्यकर्त्यांना धीर आला. काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या मानकी गावात भाजपाला ६0 मतांची आघाडी मिळाली. झाडूपाहिजे त्या प्रमाणात चाललाच नाही. पतया निवडणुकीच्या निकालाने दिसून आली. भाजपा व शिवसेनेचे पुढारी व पदाधिकारी मात्र या निवडणुकीत प्रशंसेस पात्र ठरले. तथापि मोदी लाटेतही मजरा, मच्छिंद्रा, घोगुलदरा, जळका, बोटोणी, मारेगाव शहर, सराटी, वागदरा, खंडणी, रोहपट, पेंढरी, सुर्ला, पाचपोहर, कटली बोरगाव, माथार्जुन, झरीजामणी, कमळवेल्ली या गावांनी काँग्रेसला आघाडी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढार्‍यांनी यावेळी झाडूला उघड मदत केली. मात्र त्यांच्या हाकेला मतदारांनी साथ दिली नाही. राष्ट्रवादीच्या पुढार्‍यांच्या गावातही कमळालाच आघाडी मिळाली. वेगाव, सिंधीवाढोणा, गणेशपूर, ब्राम्हणी, सावर्ला या गावांचे आकडे ही स्थिती दर्शवितात. शांतकरण्यात काँग्रेसला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. या लाटेमध्ये फारसे परिवर्तन झाले नाही, तर काँग्रेसला पराभवाच्या जोखडातून बाहेर पडणे अशक्य ठरणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच स्थानिक कार्यकर्त्यांनी धडपड करण्याची गरजेचे झाले आहे.

निदान पुढार्‍यांच्या गावात तरी काँग्रेस आपले प्राबल्य दाखवतील, असे सांगितले जात होते.

वणी विधानसभा मतदार संघातील मेंढोली, मोहोर्ली, मंदर, भालर, कुरई, पुनवट, कानडा, कुंभा या काँग्रेस नेत्यांच्या गावातही काँग्रेस माघारली. विभागातील सर्वात मोठे गाव राजूर (कॉलरी) येथे कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस व बसपाला बहुमत असायचे. तेथे भाजपाला ४00 मतांची आघाडी मिळाली. भाजपाला १४३८, काँग्रेसला १0३९, बसपाला ६६२ व आपला ३६७ मते मिळाली. चिखलगावात सरपंच काँग्रेसचे असतानाही तेथे काँग्रेस माघारली. झरी तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तेथेही काँग्रेसची घसरण झाल्याचे दिसत आहे.

मारेगाव तालुक्यात वामनराव चटपांना अल्प प्रतिसाद मिळाला. नांदेपेरा व उकणी या गावांमध्ये तसेच तरोडा, बाबापूर, डोर्ली, शिंदोला, शिवणी, येनक, परमडोह, कळमना या गावांनी चटपांना आघाडी दिली. वणी शहरातील ४४ बुथपैकी केवळ तीन बुथवर काँग्रेस पुढे राहिली. ४१ बुथवर कमळच फुलले. एकट्या वणी शहराने अहीर यांना नऊ ५३४ मतांची आघाडी दिली. शहरातील १४ हजार ६४७ मते भाजपाला, तर पाच हजार ११३ मते काँग्रेसला मिळाली. शहरात चटपांना फारशी साथ मिळाली नाही. ग्रामीण भागात

काँग्रेसचे तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांची त्यांच्या गावात असलेली

आता विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे या लाटेला

Web Title: BJP's Sarasi in the town of the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.