भाजपाच्या ‘मिशन नगरपरिषदे’ला प्रारंभ

By Admin | Updated: June 24, 2016 02:42 IST2016-06-24T02:42:49+5:302016-06-24T02:42:49+5:30

जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होवू घातली आहे. नुकताच प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

BJP's 'Mission Municipal Council' started | भाजपाच्या ‘मिशन नगरपरिषदे’ला प्रारंभ

भाजपाच्या ‘मिशन नगरपरिषदे’ला प्रारंभ

बैठक : पदवीधर सदस्य नोंदणीवरून कानउघाडणी
यवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होवू घातली आहे. नुकताच प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेला भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र पाचव्या क्रमांकाचा पक्ष आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी मिशन नगरपरिषद राबविण्याचे निर्देश भावे मंगल कार्यालयात गुरुवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आले.
भाजपाचे संपर्क प्रमुख आमदार गिरीष व्यास, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजेंद्र नजरधने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीला जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेली भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही सत्तेत यावी, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात यवतमाळ या मुख्यालयाच्या नगरपरिषदेसह पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, घाटंजी, वणी, उमरखेड या नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विशिष्ट असा चेहरा कॅम्पेनिंगसाठी नसला तरी शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवून बांधणी करावी, असे सांगण्यात आले. बैठकीत गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पदवीधरच्या सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्याने सदस्य नोंदणीचे आकडे सांगितले. त्यानंतर सेंटरनिहाय प्रत्यक्षात नोंदणी किती झाली, याचा लेखाजोगा खुद्द गृह राज्यमंत्र्यांनी मांडला. त्यामुळे फुशारकी मारणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांची पोलखोल झाली. सदस्य नोंदणीसाठी गंभीर राहून काम करा, असे सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: BJP's 'Mission Municipal Council' started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.