शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये भाजपा-सेनेचा राडा; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 21:45 IST

भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली.

दिग्रस (यवतमाळ): भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. पुलाच्या लोकार्पणावरून चक्क सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासमक्ष हा राडा झाला. राठोड यांना भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीही केल्याने तणाव निर्माण झाला होता. 

दिग्रस-पुसद मार्गावरील बहुप्रतीक्षित पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले. त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिका शहरात वाटण्यास सुरुवात होताच राजकीय पुढा-यांमध्ये कुजबूज सुरू झाली. कारण पत्रिकेवर ना. सजंय राठोड यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी व दिग्रसच्या नगराध्यक्ष सदफजहा जावेद पहेलवान यांच्यापैकी कोणाचीच नावे नव्हती. एवढेच नव्हेतर ‘विनित’ म्हणूनही सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी शिवसेना व शिवसेनेच्या इतर शाखांची नावे होती. त्यामुळे हा पूल शासकीय निधीतून झाला की शिवसेनेने बांधला, असा प्रश्न करत नगराध्यक्षासह विरोधी  नगरसेवकांनी सायंकाळी शंकर टॉकीजसमोर प्रचंड राडा केला.ना. संजय राठोड येताच त्यांचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काळे झेंडे दाखवत त्यांच्या व शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना व भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला, अशी चर्चा आहे. ना. राठोड यांना ठरल्यानुसार शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचे पूजन करायचे होते. पण या राड्यामुळे त्यांना थेट लोकार्पण सोहळ्याकड़े जावे लागले. 

नगराध्यक्ष सदफजहा, माजी नगराध्यक्ष व भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र अरगडे, विविध कार्यकारी संस्थेचे सभापती बाबूसिंग जाधव, नगरसेवक जावेद पहेलवान, रुस्तम पप्पूवाले, सैयद अकरम, भाजपचे बबलू ओसवाल, प्रज्योत अरगडे, विजय सरदार, साहील जयसवाल, मनीष मुनी, विजय अंबुरे, शिल्पा खंडारे, डॉ. अजय शिंदे, प्रशांत गौरकर, हरीश सांखला यांच्यासह माजी मंत्री संजय देशमुख यांचे समर्थक व  भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

नेत्यांची युती, कार्यकर्त्यांचे काय?भाजपा-सेनेत नुकतीच राष्ट्रीय स्तरावर युती झाली. मात्र, दिग्रसमध्ये युतीच्या घोषणेच्या दुस-याच दिवशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. ते पाहता, ही फक्त नेत्यांमधील युती असून जोपर्यंत कार्यकर्त्यांची दिलजमाई होत नाही, तोपर्यंत युतीचे देऊळ पाण्यातच राहणार असल्याचे दिसते.

टॅग्स :YavatmalयवतमाळBJPभाजपाShiv Senaशिवसेना