शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचा भाजपला विसर : सपकाळ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:35 IST

Yavatmal : काँग्रेसची दाभडी ते आर्णी शेतकरी सन्मान पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी (यवतमाळ): २०१४ मध्ये दाभडी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यासह तब्बल १६ आश्वासने दिली होती. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या ११ वर्षात यापैकी एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केलेले नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळेच आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करून देण्यासाठी काँग्रेसतर्फे दाभाडीतील ओंकारेश्वर मंदिरापासून ही पदयात्रा निघाली.

यात्रेत गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, अनिस अहमद, वसंत पुरके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार बाळासाहेब मांगूळकर, आमदार राजेश राठोड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आर्णी येथे पदयात्रेचे मेळाव्यात रूपांतर झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, या घोषणांचे काय झाले? यातील एक तरी घोषणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पूर्ण केली का? असा सवाल करीत हे सरकार केवळ धनाड्या उद्योगपतींचे असल्याचे ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात शेतकरी, शेतमजूर समाधानी होता, यावर त्यांनी जोर दिला.

माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, असा सवाल सरकारला केला. ऑपरेशन सिंदूरचे राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, सर्वसामान्यात सरकारच्या कारभाराबाबत प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप सरकारला केवळ उद्योगपतींची काळजी

  • राज्यातील शेतकऱ्यांचे आज प्रचंड हाल सुरू आहेत. हरभरा, कापूस, सोयाबीन, तुरीसह कांद्याला भाव नाही.
  • सोयाबीनला ३५ ते ४० रुपये किलो भाव असताना सोयाबीन तेलाची किंमत मात्र १६५ रुपये लिटरवर गेली आहे. हा मधला मलिदा उद्योगपती खात आहेत.
  • भाजपने 'हर घर तिरंगा अभियान राबविले. मात्र, त्यासाठी चीनमधून पॉलिस्टरचे झेंडे मागविल्याची टीका करीत शेतकरी, शेतमजुरांच्या हक्काची लढाई काँग्रेस यापुढेही लढत राहील, अशी ग्वाही सपकाळ यांनी दिली.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ