भाजपा जिल्हाध्यक्षांचे वाहन पुलात कोसळले
By Admin | Updated: June 20, 2017 01:18 IST2017-06-20T01:18:25+5:302017-06-20T01:18:25+5:30
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांचे वाहन सोमवारी पुलाखाली कोसळले. सकाळी ११ च्या सुमारास ते स्वत: ड्रायव्हिंग करीत स्कॉर्पिओने (एमएच२९-९५५९) आंधबोरी येथील शेतात जात होते.

भाजपा जिल्हाध्यक्षांचे वाहन पुलात कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांचे वाहन सोमवारी पुलाखाली कोसळले. सकाळी ११ च्या सुमारास ते स्वत: ड्रायव्हिंग करीत स्कॉर्पिओने (एमएच२९-९५५९) आंधबोरी येथील शेतात जात होते. डिझेलची डबकी व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण जाऊन वाहन कात्री जवळील छोट्या पूलावरून कोसळले. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मुलाने त्वरित लोकांना गोळा करून डांगे यांना वाहनाबाहेर काढले. डांगे हे किरकोळ जखमी झाले असून घरीच आराम करीत असल्याची माहिती त्यांची पत्नी संगीता डांगे यांनी ‘लोकमत’ला दिली.