भाजपा नगरसेवक पातेला बलात्कार प्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 05:28 IST2018-07-21T05:28:21+5:302018-07-21T05:28:23+5:30
युवतीला ब्लॅकमेल करीत तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली वणी नगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक धीरज पाते याला शुक्रवारी वणी पोलिसांनी अटक केली.

भाजपा नगरसेवक पातेला बलात्कार प्रकरणी अटक
वणी (यवतमाळ) : युवतीला ब्लॅकमेल करीत तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली वणी नगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक धीरज पाते याला शुक्रवारी वणी पोलिसांनी अटक केली. यापूर्वीसुद्धा एका बलात्काराच्या प्रकरणात पाते हा सहआरोपी होता. पीडित युवतीने शुक्रवारी सकाळी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.