भाजपाध्यक्षांना हेव्यादाव्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:10+5:30

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांची त्यासाठी इंच्छुकांकडून मनधरणी सुरू आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील हे राजकीय हेवे-दावे भाजपच्या पराभवासाठी पुरेसे असल्याचे विरोधक सांगत आहेत.

BJP chief challenges envy | भाजपाध्यक्षांना हेव्यादाव्याचे आव्हान

भाजपाध्यक्षांना हेव्यादाव्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देउमरखेड मतदार संघ : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू

ज्ञानेश्वर ठाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्षांच्या उचलबांगडीनंतर उमरखेड विधानसभेचे पुत्र नितीन भुतडा यांच्या खांद्यावर पक्षश्रेष्ठींने जिल्ह्याची धुरा सोपविली. मात्र त्यांच्यापुढे आता पक्षातील अंतर्गत राजकीय हेव्या-दाव्यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांची त्यासाठी इंच्छुकांकडून मनधरणी सुरू आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील हे राजकीय हेवे-दावे भाजपच्या पराभवासाठी पुरेसे असल्याचे विरोधक सांगत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची नागपूर येथे २७ ऑगस्ट रोजी एक बैठकही पार पडली आहे.
विद्यमानांना डावलून नवीन चेहरा देण्यासाठी पक्ष भलेही धोका पत्करणार नाही. मात्र भाजपचे काही स्थानिक पुढारी व पदाधिकारी इच्छुकांना आपल्या वाहनातून बसवून फिरवत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत आपला ‘भाव’ वधारण्यासाठी संबंधितांकडून असे अनेक प्रकार सुरू असल्याची बोलले जात आहे.

आयाराम-गयारामांचे मनोबल वाढले
उमरखेड मतदार संघातून सलग दोनदा निवडून येण्याचा बहुमान अद्याप कुणीच प्राप्त केला नाही. त्यामुळे पक्षातील काही आयाराम-गयारामांचे मनोबल वाढले आहे. याच राजकीय हेव्या-दाव्याचे आव्हान नवनिर्वाचित भाजप अध्यक्ष कसे पेलतील, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आपल्याकडे शाबूत ठेवण्याची, जबाबदारीही नवनिर्वाचित अध्यक्षांना पार पाडावी लागणार आहे.

Web Title: BJP chief challenges envy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.