शिवसैनिकांवर भाजपा उमेदवाराचा हल्ला

By Admin | Updated: February 17, 2017 02:27 IST2017-02-17T02:27:12+5:302017-02-17T02:27:12+5:30

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे समर्थक शिवसैनिकावर भाजपा उमेदवाराने हल्ला केल्याची घटना जिल्हा परिषद निवडणूक मतदानादरम्यान

BJP candidates attack Shiv Sena | शिवसैनिकांवर भाजपा उमेदवाराचा हल्ला

शिवसैनिकांवर भाजपा उमेदवाराचा हल्ला

दिग्रस तालुक्यात निवडणूकीला गालबोट : एक गंभीर जखमी, परस्परांविरुद्ध तक्रारी
दिग्रस : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे समर्थक शिवसैनिकावर भाजपा उमेदवाराने हल्ला केल्याची घटना जिल्हा परिषद निवडणूक मतदानादरम्यान तालुक्यातील कळसा येथे घडली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, परस्परविरुद्ध तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील कळसा येथे जिल्हा परिषदेसाठी गुरूवारी मतदान सुरू होते. त्यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे खंदे समर्थक राहुल विठ्ठल शिंदे हे दुर्गामाता मंदिरासमोर उभे होते. त्यावेळी एका वृद्धाने त्यांना नमस्कार केला. त्यावरून भाजपा उमेदवार बाबूसिंग जाधव यांनी त्या वृद्धास उद्देशून शिंदे यांच्याबद्दल असभ्य शब्द वापरले. याचा जाब विचारला असता हाणामारीस सुरूवात झाली. बाबूसिंग जाधव यांचे समर्थक शिंदे यांना काठीने मारहाण करीत होते. त्यावेळी गावातील गजानन साखरकर हा तरूण मधात आला. त्या डोक्याला आणि पाठीला जबर दुखात झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला प्रथम दिग्रस व नंतर यवतमाळ येथे उपचारार्थ हलविण्यात आले. या घटनेची माहिती होताच कळसा येथे एकच गर्दी झाली. पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले. त्याचवेळी माजी राज्यमंत्री संजय देशमुख व माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे यांचे वाहन आले. जमाव त्यांच्या दिशेने धावून जाणार त्यावेळी पोलिसांनी प्रसांगवधान राखल्याने अनर्थ टळला.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी दिग्रस गाठून कळसा येथे चोख बंदोबस्त लावला. राहुल शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाबूसिंग तुकाराम जाधव, अरुण जाधव, प्रकाश जाधव, नरेश जाधव, भाऊ जाधव, मिथून राठोड, अनिल जाधव, शेषराव जाधव, प्रदीप जाधव, प्रवीण जाधव, पंजाब जाधव, बाबाराव जाधव यांच्याविरुद्ध तर बाबूसिंग जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल शिंदे, राजू शिंदे, गोपाल शिंदे, नामदेव शिंदे, नरेंद्र शिंदे, भीमराव जाधव, अरुण महिंदे्र, युवराज जाधव, रवींद्र पाटे, अच्चुत महिंदे, सुरेश खुळे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने कळसा येथे काही काळ तणाव निर्माण झाल होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: BJP candidates attack Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.