तरुणाला जन्मपेठ
By Admin | Updated: December 2, 2015 02:33 IST2015-12-02T02:33:24+5:302015-12-02T02:33:24+5:30
शेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा ठोठावली.

तरुणाला जन्मपेठ
वृद्धेचा खून : घाटंजी तालुक्यातील घटना
यवतमाळ : शेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा ठोठावली. हा निकाल प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश डी.आर.शिरसाव यांनी मंगळवारी दिला.
मोहन मोतीराम जाधव (३८) रा. आंबेझरी ता. घाटंजी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आंबेझरी येथील जिमीबाई तुकाराम जाधव (६०) या महिलेचा १८ सप्टेंबर २०१३ रोजी खून झाल्याचे पुढे आले होते. शेतात एका रस्त्यावर झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या अंगावरील सर्व दागिने लंपास केले होते. घाटंजी पोलीस ठाण्यात मोहन तुकाराम जाधव याने तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी मोहन मारोती जाधव याला अटक केली. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली देत जिमीबाईचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले होते.
यावरून पोलिसांनी दोषारोपपत्र तयार करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या खटल्यात न्यायालयाने तब्बल १७ जणांची साक्ष तपासली. त्यात आरोपीविरुद्ध खून आणि लुटपाट केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मपेठेची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड.नीती दवे यांनी युक्तीवाद केला. तर बचाव पक्षातर्फे अॅड. अजय चमेडिया यांनी काम पाहिले. (कार्यालय प्रतिनिधी)