शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ जिल्ह्यातील देऊळगाव वळसा येथे होणार पक्षी उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 11:31 IST

जंगलांच्या ऱ्हासाने पक्षांची किलबिलाट दुर्मिळ होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी देऊळगाव वळसा गावात वनपर्यटन विकास योजनेतून पक्षी उद्यान साकारले जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पहिलाच प्रयोगदुर्मिळ पक्ष्यांसह औषधी वनस्पतींचा होणार सुकाळ

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जंगलांच्या ऱ्हासाने पक्षांची किलबिलाट दुर्मिळ होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी देऊळगाव वळसा गावात वनपर्यटन विकास योजनेतून पक्षी उद्यान साकारले जाणार आहे. त्यामध्ये पक्षांचे खाद्य निर्माण करणाऱ्या झाडांची खास लागवड करण्यात येणार आहे.दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा या ठिकाणी पक्षी उद्यान साकारण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ५० हेक्टर क्षेत्रावर २०१६ मध्ये ‘बर्ड पॅराडाईज’मध्ये वृक्षारोपणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत २५ हेक्टरवर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. कम्पाउंड वॉल, चेनलींग फिनसिंग, अंतर्गत रस्ते, गेट, वॉच सेंटरची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे.दीड कोटी रूपयांच्या निधीतून हे पक्षी उद्यान उभे राहणार आहे. पक्षीप्रेमींना पक्षी न्याहाळण्यासाठी खास व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी उंबर, वड, चेरी, बोरी, जांभूळ या झाडांची लागवड करण्यात आली आहे. अशाच पद्धतीच्या अन्य काही वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ‘पक्षी थांब्याची झाड’ही राहणार आहे. यामुळे पक्षीप्रेमींना दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे टिपता येणार आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच पक्षी उद्यान ठरणार आहे.‘अ‍ॅरोमा पार्क’मध्ये कॅन्सरवर मात करणाऱ्या वनस्पतीनेरच्या ‘अ‍ॅरोमा पार्क’मध्ये कॅन्सरवर मात करणारी वनस्पती पाहायला मिळणार आहे. यासोबतच सर्पगंधा, अडूळसा, हिरडा, त्रिफळाचूर्ण याही वनस्पती राहणार आहे. त्या वनस्पती समोर त्याचे नाव आणि त्याचा उपयोग लिहिलेला असणार आहे. यामुळे येणाऱ्या पिढीला आयुर्वेदिक वनस्पतीचे महत्व कळणार आहे.

सर्व जातीचे बांबूबांबू या वनस्पतीमध्ये अनेक प्रकार आढळतात. त्याची ओळख प्रत्येकाला व्हावी म्हणून देऊळगाव वळशात अशा सर्व जातीचे बांबू पाहायला मिळणार आहे.

देऊळगाव वळशात पक्षी उद्यान उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. बहुतांश काम शेवटच्या टप्प्यात आहे. पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे उद्यान परवणी ठरणार आहे.- भानुदास पिंगळेउपमुख्य वनसंरक्षक, यवतमाळ

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य