विजय दर्डा यांच्या विकास निधीतील सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन
By Admin | Updated: December 18, 2014 02:22 IST2014-12-18T02:22:52+5:302014-12-18T02:22:52+5:30
लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ४ मधील सिध्देश्वरनगरात सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन बुधवारी झाले. खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून सांस्कृतिक भवनाची निर्मिती होणार आहे.

विजय दर्डा यांच्या विकास निधीतील सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन
यवतमाळ : लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ४ मधील सिध्देश्वरनगरात सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन बुधवारी झाले. खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून सांस्कृतिक भवनाची निर्मिती होणार आहे. या कामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिक सुधार समितीने पुढाकार घेत या भागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी भवनाची निर्मिती करण्याची मागणी खासदार विजय दर्डा यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी तत्काळ मंजूर करून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक सुधार समितीचे अध्यक्ष केशवराव मुनेश्वर, सचिव राजुसिंग चव्हाण, विलास देशपांडे, अजय तातड, मनोज देशपांडे, कंत्राटदार जी.डी. गुघाने, संचालक नरेंद्र उज्जैनकर, प्रकाश राऊत, ज्ञानेश्वर लोखंडे, दिवाकर आठवले, वसंत भोयर, राजू चिलजवार, महादेवराव पिंगळे, वसंतराव बोडाले, तेजराव कराळे, खुशाल काळे, सुभाष अस्वार, मुनिराज गजभिये, जय योगेश महिला बचत गटाच्या सुनीला उपाध्याय, चंदा शिंदे, अनिता नक्षणे, तारा उघडे, सुनंदा चवरे, मीना कुरसंगे आदी यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)