शेतीच्या प्रगतीत जैवतंत्रज्ञान महत्त्वाचे
By Admin | Updated: April 20, 2015 00:10 IST2015-04-20T00:10:27+5:302015-04-20T00:10:27+5:30
जैवतंत्रज्ञानाच्या प्रगतीने शेतकरी पुढे जाऊ शकतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे.

शेतीच्या प्रगतीत जैवतंत्रज्ञान महत्त्वाचे
सुधीर मुनगंटीवार : जैवतंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीची पायाभरणी
यवतमाळ : जैवतंत्रज्ञानाच्या प्रगतीने शेतकरी पुढे जाऊ शकतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे. यवतमाळ येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची पायाभरणी कृषी विकास दर वाढविण्यासाठी मोलाची ठरेल, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वाघापूर रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीची पायाभरणी रविवारी दुपारी मुनगंटीवार यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय राठोड, आमदार मनोहरराव नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक ऊईके, प्रा. राजू तोडसाम, राजू नजरधने, संजीवरेड्डी बोदकुरवार, ख्वाजा बेग, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, नितीन हिवसे, कृषी अधिष्ठाता डॉ. विलास भाले, विस्तार शिक्षणचे संचालक डॉ. प्रदिप इंगोल, विद्यापीठ अभियंता दिलीप महल्ले उपस्थित होते.
कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील शेतीशी निगडीत तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी या महाविद्यालयाने मोलाची भुमिका बजावावी, असे वित्तमंत्री म्हणाले. शासन देशी बियाण्यांची बँक तयार करीत असून, त्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सर्वच प्रकारे मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या
प्रत्येकाने सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता राजेंद्र गाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापूरकर, डॉ. एन.डी. पालार्वार, डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्यासह शेतकरी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)