भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान

By Admin | Updated: March 13, 2016 02:58 IST2016-03-13T02:58:33+5:302016-03-13T02:58:33+5:30

तालुका कृषी कार्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात आले. यानिमित्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. .....

Biliraja consciousness campaign at Bhambora | भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान

भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान

घाटंजी : तालुका कृषी कार्यालय आणि ग्रामपंचायतीच्यावतीने भांबोरा येथे बळीराजा चेतना अभियान राबविण्यात आले. यानिमित्त जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य उषा राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी माळोदे यांच्या हस्ते झाले. सरपंच छाया राठोड अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कुंटवार, राठोड, सहदेव राठोड, ननवरे, मिलिंद चव्हाण, डोंगरे, दिलीप राठोड, स्वानंद चव्हाण, अरुण पवार, ज्ञानेश्वर लोखंडे, भारत राठोड, राजू मांजरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला कनाके, माया चव्हाण, सिंपल राठोड, प्रेमिला जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी माळोदे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी ताठरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप राठोड यांनी, तर आभार कोलपावार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपला जाधव, शिवलाल राठोड, प्रल्हाद चव्हाण, भगवान लुटे, दयाराम राठोड, किसन राठोड, शंभूजी धुर्वे, मिलिंद कांबळे, शंकर काळे आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Biliraja consciousness campaign at Bhambora