लहान्याने केला मोठ्या भावाचा खून
By Admin | Updated: September 10, 2015 02:57 IST2015-09-10T02:57:33+5:302015-09-10T02:57:33+5:30
दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या मोठ्या भावाचा लहान्याने काठीचा प्रहार करून खून केल्याची घटना तालुक्यातील बाबापूर येथे मंगळवारी रात्री घडली.

लहान्याने केला मोठ्या भावाचा खून
बाबापूरची घटना : दारुडा भाऊ देत होता त्रास
वणी : दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या मोठ्या भावाचा लहान्याने काठीचा प्रहार करून खून केल्याची घटना तालुक्यातील बाबापूर येथे मंगळवारी रात्री घडली. सुरुवातीला लहान्याने पोलीस ठाण्यात येवून अतिदारू प्राशनाने भावाचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते.
प्रमोद उगम मेश्राम (३१) असे मृताचे नाव आहे. पत्नी माहेरी गेल्याने तो एकटाच राहात होता. दारू पिऊन तो शेजारीच राहणारा लहान भाऊ विनोद उगम मेश्राम (२७) आणि आई ताईबाई (५५) यांना नेहमी त्रास देत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे प्रमोद दारू पिवून घरी आला. त्याने लहान भावाला आणि आईला शिवीगाळ सुरू केली. लहान भावाचा संयम सुटून त्याने प्रमोदच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. त्यात तो जागीच ठार झाला. यानंतर शिरपूर ठाणे गाठून आपला भाऊ दारू प्राशनाने मरण पावल्याची तक्रार दिली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी चौकशी केली, तेव्हा त्याचा खून झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी विनोदला बोलते केले. त्याने मोठ्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. (कार्यालय प्रतिनिधी)