शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

यवतमाळ ‘एलसीबी’साठी ३५ लाखांची बोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षकपदी सध्या प्रदीप शिरस्कर आहेत. सुरुवातीला वेळोवेळी ‘मार्गदर्शन’ घेऊन एलसीबीचा ‘हिशेब’ चालत होता. आता मात्र स्वत:च थेट सर्व काही ‘ऑपरेट’ केले जाते. एलसीबी जिल्हा पोलीस दलात वरकमाईसाठी ओळखली जाते. कारण वणीपासून उमरखेडपर्यंत त्यांचे ‘नियंत्रण’ असते. या एलसीबीची पोलीस अधिकाऱ्यांना नेहमीच ‘भुरळ’ पडते.

ठळक मुद्दे‘वरकमाई’वर डोळा : नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्याची चंद्रपूरमार्गे काटोलमध्ये ‘फिल्डींग’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘मिनी एसपी’ म्हणून ओळखले जाणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे पद जिल्हा पोलीस दलात महत्त्वाचे आहे. सर्वाधिक वरकमाईचे पद म्हणूनही याकडे पाहिले जाते. यवतमाळच्या या पदाकरिता तब्बल ३५ लाख रुपयांची बोली लावली गेली आहे. एवढी रक्कम मोजणारा हा पोलीस अधिकारी कोण? याची चर्चा जिल्हा पोलीस दलात होताना दिसते.यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षकपदी सध्या प्रदीप शिरस्कर आहेत. सुरुवातीला वेळोवेळी ‘मार्गदर्शन’ घेऊन एलसीबीचा ‘हिशेब’ चालत होता. आता मात्र स्वत:च थेट सर्व काही ‘ऑपरेट’ केले जाते. एलसीबी जिल्हा पोलीस दलात वरकमाईसाठी ओळखली जाते. कारण वणीपासून उमरखेडपर्यंत त्यांचे ‘नियंत्रण’ असते. या एलसीबीची पोलीस अधिकाऱ्यांना नेहमीच ‘भुरळ’ पडते. म्हणूनच की काय एका पोलीस अधिकाºयाने एलसीबीसाठी फिल्डींग लावली होती. मात्र ‘आठ’वडा भरातच ही फिल्डींग बिघडली. त्यामुळे त्या अधिकाºयाने आता पांढरकवडा पोलीस ठाण्यावर लक्ष केंद्रीत केले.थेट चंद्रपूर एलसीबीतून लॉबिंगयवतमाळ ‘एलसीबी’वर अनेकांचा डोळा आहे. त्यासाठी नागपूर ग्रामीणमधील एका पोलीस अधिकाºयाने चक्क ३५ लाख रुपयांची बोली लावल्याची चर्चा पोलीस दलात आहे. चंद्रपूर एलसीबी मार्गे काटोलला यासाठी फिल्डींग लावण्यात आली. ३० लाख रुपये काटोलच्या साहेबांना, पाच लाख रुपये त्यांच्या ‘पीए’ला, शिवाय पीएला ‘दर महिना’ ठराविक रक्कम अशी ही ‘डिलिंग’ असल्याचे बोलले जाते. त्या पोलीस अधिकाºयाने ‘अनुभवातूनच’ एलसीबीच्या खुर्चीसाठी एवढी मोठी बोली लावल्याचे सांगितले जाते.एलसीबीची नेमकी वरकमाई किती ?एखादा अधिकारी केवळ पोस्टींगसाठी ३५ लाख रुपये देण्यास तयार असेल तर एलसीबीची नेमकी वरकमाई किती असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. सर्व वाटपाअंती मासिक १५ लाखांचा हिशेब एलसीबीत जुळत असल्याची चर्चा आहे. ‘३५ फिक्स’ झाले असतानाही साहेबांचा ‘पीए’ मात्र या पेक्षाही ‘आणखी मोठी’ बोली लावणारा कुणी मिळतो काय? या दृष्टीने अन्य जिल्ह्यात चाचपणी करीत आहे.पोलिसांच्या वरकमाईचे हे आहेत प्रमुख स्रोतकोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू, रेती तस्करी, प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, गांजा, अफीम या सारखे अमलीपदार्थ, शस्त्रांची तस्करी, सागवान तस्करी, दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी आधी अवैध व्यवसाय चालतात. तेच पोलिसांच्या वरकमाईचे प्रमुख स्त्रोत आहेत. याशिवाय एफआयआर नोंदविण्यासाठी येणाऱ्या कधी फिर्यादी तर कधी आरोपी पक्षाला ‘निशाणा’ बनवून व अन्याय करून खिसे भरले जातात.‘सी-ग्रेड’ ठाण्यासाठी ‘सतरा’ चकराएकूणच यवतमाळ जिल्ह्यात पोलीस विभागातील मासिक ‘उलाढाल’ किती मोठी असेल याचा अंदाज येतो. पारवा सारख्या ‘सी-ग्रेड’च्या ठाण्यासाठी इच्छुक ‘१७’ वेळा चकरा मारू शकतो तर अन्य ठाण्यांची ‘किंमत’ किती असेल याचा अंदाज येतो. पोलीस दलातील आणि विशेषत: ‘एलसीबी’तील ही मासिक ‘उलाढाल’ लक्षात घेऊनच राजकीय नेते मंडळींचे डोळे विस्फारतात. त्यातूनच मग प्रत्येक महिन्याच्या ‘१५’ तारखेला ‘भेटी’चे निमंत्रण दिले जाते.राजकीय फिल्डींग अन् ‘रॉयल्टी’हीया वरकमाईमुळेच ठाणेदारकी, शाखा प्रमुख होण्यासाठी अधिकारी वर्ग अधिक इन्टरेस्टेड असतो. त्यासाठी राजकीय फिल्डींगशिवाय रॉयल्टीचा मार्गही निवडला जातो. त्यात कुणाला यश येते तर कुणाला कमी रॉयल्टी भरल्याने अपयश येते. खुर्ची हलल्यास अशावेळी ‘मॅट’चा मार्गही अनेकदा स्वीकारला जातो. परंतु त्यातून प्रशासकीय प्रमुख आणि सरकारच्या नाराजीचा पुढे वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागतो.

टॅग्स :Policeपोलिस