सायकलमध्ये सुतळी अटकवून रोख पळविली

By Admin | Updated: February 8, 2016 02:43 IST2016-02-08T02:43:59+5:302016-02-08T02:43:59+5:30

सायकलच्या चाकात सुतळी अटकवून सायकलवरील २२ हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी येथील गांधी चौकात घडली.

In the bicycle, the twine was captured and caught by cash | सायकलमध्ये सुतळी अटकवून रोख पळविली

सायकलमध्ये सुतळी अटकवून रोख पळविली

पुसदची घटना : बॅगेत होते २२ हजार
पुसद : सायकलच्या चाकात सुतळी अटकवून सायकलवरील २२ हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी येथील गांधी चौकात घडली.
यवतमाळच्या आनंदनगरातील महेश रमेश राणे (२९) हे पुसद येथे औषधी दुकानाच्या वसुलीसाठी आले होते. बसस्थानकासमोरुन भाड्याने सायकल घेऊन ते गांधी चौकातील गणपती मेडिकलमध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या सायकलच्या चाकात कुणी तरी सुतळी अडकविली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आपल्या जवळील बॅग गणपती मेडिकलच्या काऊंटरवर ठेवली आणि सुतळी काढू लागले. त्यावेळी मेडिकलमध्ये असलेल्या दोघांचे लक्ष नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने ही बॅग पळविली. या बॅगमध्ये २१ हजार ७०० रुपये रोख, तीन चेक, पावतीबुक आदी मुद्देमाल होता. सायकलची सुतळी काढल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. परंतु थांगपत्ता लागला नाही. अखेर पुसद शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. पुसद शहरात गत काही दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली. आता तर चोरट्यांची भरदिवसा चोरी करण्यापर्यंत हिंमत झाल्याचे या घटनेवरून दिसून येते. जणू पोलिसांचा वचक संपला. (प्रतिनिधी)

Web Title: In the bicycle, the twine was captured and caught by cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.