घाटुंबा येथे भिवसन महापूजा व प्रबोधन

By Admin | Updated: March 2, 2016 02:57 IST2016-03-02T02:57:24+5:302016-03-02T02:57:24+5:30

सटवाई माता घाट (घाटुंबा) येथे भिवसन महापूजा आणि समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.

Bhivasan Mahapooja and Prabodhan at Ghatumba | घाटुंबा येथे भिवसन महापूजा व प्रबोधन

घाटुंबा येथे भिवसन महापूजा व प्रबोधन

मेटीखेडा : सटवाई माता घाट (घाटुंबा) येथे भिवसन महापूजा आणि समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. क्रांतिवीर शामादादा कोलाम विदर्भ संघटनेचे प्रांताध्यक्ष भोनूजी टेकाम यांच्या पुढाकारात आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार राजू तोडसाम लाभले होते.
घाटुंबा येथे भवानी मातेची मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीचे पूजन करून भिवसन महापूजा करण्यात आली. यानंतर समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून किरण कुमरे, पांढरकवडाचे गटविकास अधिकारी घसाळकर, राळेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे, शिवारेड्डी येल्टीवार, राकाँचे तालुकाध्यक्ष विजय तेलंगे, गंगाधर महाराज लोणसावळे, शिवणीच्या सरपंच दुर्गा राठोड, घाटुंबाच्या उपसरपंच ज्योत्स्ना जाधव, नीलाबाई सिलेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन राम तोडकर यांनी तर आभार लेतुजी जुनघरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी वसंता कासार, सोनेराव आडे, अंकुश आत्राम, दिलीप बिलारे, प्रभाकर मसराम आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Bhivasan Mahapooja and Prabodhan at Ghatumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.