शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

पुसदमध्ये भीमरायाला मानाचा मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:42 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भीम सैनिकांनी त्यांना मानाचा मुजरा केला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात : शोभायात्रा, दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भीम सैनिकांनी त्यांना मानाचा मुजरा केला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.स्थानिक महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पुढाकारात येथील डॉ.आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी अ‍ॅड.अप्पाराव मैंद, भीमराव कांबळे, धनंजय अत्रे, विश्वास भवरे, महेश खडसे, सूरज वरठी, राजू साळुंके, भाऊ अघम, कालू पहेलवान, प्रा.प्रमोद दवणे, पंकज जयस्वाल, भगवान हनवते, सुधाकर जाधव, राहूल कांबळे आदींनी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी माजी प्राचार्य बनसोड यांच्या मार्गदर्शनात सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष अनिताताई नाईक, आमदार मनोहरराव नाईक यांनी डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष सूरज वरठी यांच्यासह शहरातील मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर सकाळी ९ वाजता शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीला ठाणेदार अनिलसिंह यांनी निळी झेंडी दाखविली.शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करून ही रॅली डॉ.आंबेडकर चौकात पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप झाला. दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन रॅली काढण्यात आली. शहरातील विविध वॉर्डातील लहान मोठ्या रॅली शिवाजी चौकात एकत्र आल्या. तेथून मोठ्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य कटआऊट, विविध देखावे व डिजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सुभाष चौकात ययाती नाईक मित्रमंडळ व निशांत बयास मित्रमंडळातर्फे भोजनाची तर विविध सामाजिक संस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, ठाणेदार गौतम यांच्या मार्गदर्शनात दोन सहायक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, ९० कर्मचारी व गृहरक्षक दलाचे १५ जवान बंदोबस्तासाठी तैनात होते. या शिवाय मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर होती.मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष सूरज वरठी, माजी अध्यक्ष महेश खडसे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती