Bhimnagar, Indiranagar residents quenched their thirst at their own expense | स्वखर्चाने भागविली भीमनगर, इंदिरानगरवासीयांची तहान

स्वखर्चाने भागविली भीमनगर, इंदिरानगरवासीयांची तहान

पंचायत समिती सदस्य कल्पना प्रशांत गडदे यांनी स्वखर्चाने ग्रामस्थांची तहान भागविली.

कल्पना गडदे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी स्वखर्चाने पंढरी मारकड यांच्या बेलोरा खु. शिवारात असलेल्या बोअरवेलवरून बेलोरा बु. या दोन किलोमीटर अंतरावरून लिंबाराव मारकड यांच्या गावाजवळील विहिरीत पाणी आणले. विहिरीतून हे पाणी भीमनगर व इंदिरानगर येथे जिल्हा परिषदेच्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या जुन्या टाक्या उपयोगात आणून पाेहोचविले. यामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध झाले.

रामनगर येथे दररोज स्वखर्चाने चार ते पाच पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत. आता येथील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे महिला व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य गीता नामदेव गडदे, पंचायत समिती सदस्य कल्पना प्रशांत गडदे यांनी स्वखर्चाने दोन किलोमीटर पाईपलाईन टाकली. त्यांचे गावकऱ्यांनी आभार मानले.

Web Title: Bhimnagar, Indiranagar residents quenched their thirst at their own expense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.