भीम टायगर सेनेची मोटारसायकल रॅली
By Admin | Updated: October 26, 2015 02:28 IST2015-10-26T02:28:33+5:302015-10-26T02:28:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराला अधिक गतीमान करण्यासाठी येथील भीम टायगर सेनेच्यावतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले ...

भीम टायगर सेनेची मोटारसायकल रॅली
धम्म प्रचार : पुसद ते नागपूर रॅलीला प्रारंभ, युवा वर्गाचा प्रतिसाद
पुसद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराला अधिक गतीमान करण्यासाठी येथील भीम टायगर सेनेच्यावतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले असून पुसद ते नागपूर मोटरसायकल रॅलीला प्रज्ञा पर्वाचे माजी अध्यक्ष महेश खडसे यांनी निळी झेंडी दाखवून सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखोंच्या संख्येने असलेल्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या दिनाची महती म्हणून गत अर्ध्या शतकापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. धम्माच्या प्रचार-प्रसारात सहभागी होण्यासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वात पुसद ते नागपूर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या रॅलीला निळी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर या रॅलीला झेंडी दाखविण्यात आली. यावेळी बिरसा मुंडा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष मारोती भस्मे, गजानन हिंगमिरे, प्रकाश दीपके, देवानंद जगताप, अण्णा दोडके, विशाल चोपडे, अर्जुन भगत, रामभाऊ खडसे, शुभम वाकोडे, राहुल पाईकराव, राहुल गायकवाड, अनिल खंदारे, संतोष जोगदंडे, श्रीधर मुळे, टायगर धुळे, संदीप इंगोले, सुरज धुळे, रणजित कांबळे, सिद्धार्थ खडसे, संजय लोखंडे, अनिल वाहुळे, भास्कर बनसोडे, नरेंद्र भुजबळे, दयानंद डोंगरे, सचिन कापसे, दुर्गेश कदम, राहुल धुळे, विनोद धुळे, अनिल भगत, पांडुरंग दोडके, विक्रम शेजुळे, जनार्दन झोडगे, दीपक गायकवाड, गौतम धवसे, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)