शिक्षकांनी केले ‘भीक मांगो’ आंदोलन
By Admin | Updated: September 6, 2015 02:23 IST2015-09-06T02:23:37+5:302015-09-06T02:23:37+5:30
अनुदानास पात्र व विनाअनुदानित शाळेतील अन्यायग्रस्त शिक्षकांनी शनिवारी शिक्षक दिनीच जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भीक मांगो आंदोलन केले.

शिक्षकांनी केले ‘भीक मांगो’ आंदोलन
यवतमाळ : अनुदानास पात्र व विनाअनुदानित शाळेतील अन्यायग्रस्त शिक्षकांनी शनिवारी शिक्षक दिनीच जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भीक मांगो आंदोलन केले.
जिल्ह्यातील अनेक अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांना वेतनाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. दहा-पंधरा वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर सुरु असलेल्या शाळांचे प्रस्ताव ऐनवेळी आधार कार्डाची सक्ती करून शासनाने परत पाठविले. तसेच वेतन पथक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाकडून देण्यात येणाऱ्या मौखिक आदेशामुळे मानसिक त्रास होत असल्याचेही या शिक्षकांनी सांगितले. या अन्यायाच्या विरोधात राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात वंचित शिक्षकांनी भिक मांगो आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सुधांशू काळे, विनोद मोहरे, नीरज डफळे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)