भावजयीचा खून, दिराची आत्महत्या

By Admin | Updated: June 16, 2016 02:49 IST2016-06-16T02:49:45+5:302016-06-16T02:49:45+5:30

तालुक्यातील अडगाव येथील दीर-भावजयीच्या आत्महत्येचे रहस्य शवविच्छेदन अहवालात उलगडले असून भावजयीचा खून तर दिराने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

Bhajji's murder, the murder of the deceased | भावजयीचा खून, दिराची आत्महत्या

भावजयीचा खून, दिराची आत्महत्या

रहस्य उलगडले : पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
पुसद : तालुक्यातील अडगाव येथील दीर-भावजयीच्या आत्महत्येचे रहस्य शवविच्छेदन अहवालात उलगडले असून भावजयीचा खून तर दिराने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी सदर महिलेच्या पतीविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील अडगाव येथे रविवारी रेखा प्रकाश अंभोरे (३३) आणि सुवानंद हनवता अंभोरे (२०) या भावजयी -दिराने एकाच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी पती प्रकाश अंभोरे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सुरुवातीला दाखल केला होता. मात्र या प्रकरणी गावात उलटसुलट चर्चा सुरू होती. पोलीस खुनाच्या दिशेनेही तपास करीत होते. दरम्यान, खंडाळा पोलिसांना पुसद उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्या अहवालात रेखाचा मृत्यू गळा दाबून तर दीर सुवानंदने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा गळा दाबल्यानंतर सुवानंदने या प्रकाराने घाबरुन जाऊन गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच या संदर्भात गावात विविध चर्चांंना ऊत आला होता. आता शवविच्छेदनात रहस्य बाहेर आल्याने या आत्महत्येचे गूढ उलगडले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bhajji's murder, the murder of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.