विजय दर्डा यांच्या निधीतून सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन
By Admin | Updated: December 13, 2014 02:35 IST2014-12-13T02:35:11+5:302014-12-13T02:35:11+5:30
येथील भोसा मार्गावरील शादाब नगरातील बागेच्या सौंदर्यिकरणासाठी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून

विजय दर्डा यांच्या निधीतून सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन
यवतमाळ : येथील भोसा मार्गावरील शादाब नगरातील बागेच्या सौंदर्यिकरणासाठी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून साडेपाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या कामाचे भूमिपुजन शुक्रवारी लोकमत कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले.
भोसा मार्गावरील शादाबनगरातील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण केले जात आहे. खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून यापूर्वी सुरक्षा भिंत उभारण्यात आली होती. मशिदीलगतच्या या खुल्या जागेचे सौंदर्यिकरण केले जात आहे. आतील चारीबाजूने पेविंग ब्लॉक रस्ते तयार केले जाणार आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांना ही बाग आल्हाददायक वातावरणाने प्रसन्न करणार आहे. खुल्या जागेत आबाल वृध्दांना काही क्षण
निवांतात घालविण्यास मदत होणार आहे.
भूमिपुजन समारंभाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, बांधकाम विभागाचे अभियंता आर.एम. क्षीरसागर, मिलींद रामटेके, अब्दुल जाकीर, इकबाल रहेमान, अतिक काजी, महम्मद नईम, परवेश खान, समशेरखान
छोटखान, इकबाल, डॉ. हबीब, जावेद खान, रईसभाई यांच्यासह
अनेकजण उपस्थित होते.
(शहर वार्ताहर)